सिव्हील हॉस्पीटल सांगली येथे कँडलमार्चव्दारे एड्स जनजागृती
या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. नंदकुमार गायकवाड, जिल्हा कार्यक्रम अधिकारी विवेक सावंत तसेच एआरटी सेंटर सांगली, विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठान, मुस्कान संस्था, सार्थी संस्था, वेश्या अन्याय मुक्ति परिषद, आधार व विहान या स्वयंसेवी संस्थांचे अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी एड्स बाबत अधिक माहितीसाठी असलेल्या हेल्पलाईन नंबर 1097 याची जनजागृती करण्यासाठी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षामार्फत सेल्फी स्टँडी तयार करण्यात आली होती. या सेल्फी स्टँडीवर मान्यवरांनी सेल्फी घेतली.
या कार्यक्रम प्रसंगी एड्स व कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींना श्रदांजली वाहण्यात आली. तसेच या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली व जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.