Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"मला टार्गेट केलं जात आहे, त्यामुळे मला आत्महत्या करावीशी वाटतेय"

 "मला टार्गेट केलं जात आहे, त्यामुळे मला आत्महत्या करावीशी वाटतेय"


पुणे: टीईटी घोटाळ्याप्रकरणी  रोज नवनीन खुलासे होत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस हे प्रकरण चिघळत चाललं आहे. टीईटी परिक्षेत म्हणजेच शिक्षक पात्रता परिक्षेत पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे  यांना अटक करण्यात आली.

त्यानंतर तपासातून धागेदोरे अनेक बड्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहचले.

टीईटी प्रकरणात आता तुकाराम सुपेंच्या वकिलांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. टीव्ही 9 शी बोलताना सुपे याचे वकील मिलिंद पवार यांनी म्हटलं की, टीईटी घोटाळ्याच्या प्रकरणात मला टार्गेट केलं जात आहे. त्यामुळे मला आत्महत्या करावीशी वाटतेय, अशा इशारा सुपे यांनी दिला आहे.

पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली असल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, आतापर्यंत तुकाराम सुपे यांच्या घरातून जप्त केलेली रोकड आणि सोन्याचे दागिने एकूण 3 कोटी 90 लाख इतके आहे. त्यामुळे आता सुपेंच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होणार आहे. तुकाराम सुपेंवर कारवाई करण्यात आल्यावर तपासात त्यांनी लपवलेले सगळे पैसे हळूहळू समोर येत आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.