Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कॉँग्रेसने भारत बलाढ्य केला.. सेवा दलाने काँग्रेसला ताकद दिली.. पृथ्वीराज पाटील

 कॉँग्रेसने भारत बलाढ्य केला.. सेवा दलाने काँग्रेसला ताकद दिली.. पृथ्वीराज पाटील


सांगली दि. २८ :
  या देशातील जनतेच्या भरघोस योगदानामुळे म.गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने भारत स्वतंत्र केला हे काँग्रेस पक्षाचे कधीही न फिटणारे ऋण आपल्यावर आहेत. पक्षात व्यक्तीस्तोमाला थारा नाही. नेते निमित्तमात्र असून जी कामे होतात त्याचे सारे श्रेय काँग्रेस पक्षाला आहे. काँग्रेस पक्षाने घडवलेला देश मोदी विकत आहेत. महागाईने जनता त्रस्त झाली आहे. २०२४ मध्ये जनताच मोदींना घरी बसवणार आहे. काँग्रेस पक्षाच्या १३७ व्या वर्धापनदिनी व काँग्रेस सेवा दल स्थापना दिनी पक्ष संघटना व सेवा दल अधिक मजबूत करुन घराघरात काँग्रेस पक्षाचे योगदान सांगू या असे प्रतिपादन सांगली जिल्हा शहर काँग्रेस अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केले.  आज काँग्रेस भवनमध्ये आयोजित काँग्रेस पक्षाच्या १३७ वा वर्धापन दिन व काँग्रेस सेवा दलाच्या स्थापना दिन कार्यक्रमात ते बोलत होते. प्रारंभी ध्वजारोहण, वंदेमातरम, झेंडा गीत व राष्टगीत गायन आणि सेवा दलाचे संस्थापक नारायण हर्डीकर व म. गांधी यांच्या प्रतिमेला पृथ्वीराज पाटील तर स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेस प्रा. एन. डी. बिरनाळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी पृथ्वीराज पाटील व प्रा. बिरनाळे यांचा पक्ष व सेवा दलातर्फे सत्कार करण्यात आला. 

सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दलाचे अरुण पळसुले यांनी स्वागत केले.सेवा दल जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांनी प्रास्ताविकात काँग्रेस व सेवा दलाची वाटचाल व योगदान सांगितले. प्रा. एन. डी. बिरनाळे म्हणाले, 'काँग्रेस पक्षामुळे देशाचा चौफेर विकास झाला आहे. कृषिप्रधान भारत काँग्रेसने मजबूत केला आहे. नेहरू.. पटेल.. गांधी.. बोस व अनेक कुटुंबियांच्या त्यागातून हा देश उभा राहिला आहे. पक्षाच्या असंख्य नेत्यांनी रक्त सांडून स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. यासाठी घरघरमें काँग्रेस.. मनमनमें काँग्रेस.. तिरंगा बचाव अभियान राबवू या. '' 

अशोक वारे यांनी मनोगत व्यक्त केले. कालीचरण साधूंनी म. गांधी यांच्याबद्दल अनुद्गार काढल्याने त्यांचा निषेध ठराव बाबगोंडा पाटील यांनी मांडला. यावेळी काँग्रेस व सेवा दलाच्या वतीने कालीचरण साधूचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी अल्लाबक्ष मुल्ला, अरुण पळसुले, सुभाष पट्टणशेट्टी, आयुब निशानदार, विठ्ठल काळे, हणमंत यादव, शमशाद नायकवडी, जन्नतबी नायकवडी, रामलिंग परदेशी, अशोक रजपूत सुनिता मदने, नीलम  कांबळे, सुजाता सुर्यवंशी, दीपक सुर्यवंशी, अशोक वारे, रजिया अन्सारी, राजू कलाल, मदन पाटील, सुरेश पाटील, माया आरगे, श्रीधर बारटक्के, वसंत आरगे, बाबगोंडा पाटील, खुदबुद्दीन मुजावर, नामदेव पठाडे, प्रणव सुर्यवंशी व मुफीन कोळेकर व पक्ष आणि सेवा दल कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.