ओमीक्रॉमच्या पार्श्वभूमीवर सांगलीत विनामास्क व्यक्तीवर महापालिकेकडून कारवाई सुरू : नियम न पाळल्यास कारवाई होणार: नागरिकांनी नियमांचं पालन करावे: आयुक्त कापडणीस यांचे आवाहन
अँकर: ओमीक्रॉम व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगर पालिकेकडून खबरदारीचे उपाय अवलंबले जात आहेत. यासाठी महापालिका क्षेत्रात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकावर महापालिका प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशानुसार कोव्हिडं नियमांचं उल्लंघन करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येत आहे.
कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता महापालिका क्षेत्रात याचा प्रसार होऊ नये यासाठी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी खबरदारी बाबत नियोजन केले आहे. विदेशातून येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष ठेवण्यापासून ते कोव्हिडं संशयित व्यक्तीच्या काळजीबाबत सर्व नियोजन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे आजपासून सांगली मिरज आणि कुपवाड शहरात महापालिका प्रशासनाकडून विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. सांगलीत मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय लांघी, उपायुक्त राहुल रोकडे आणि सहायक आयुक्त नितीन शिंदे तर मिरजेत उपायुक्त चंद्रकांत आडके यांच्यासह वरिष्ठ स्वच्छता अनिल पाटील निरीक्षक अविनाश पाटणकर यांच्या टीमकडून विना मास्क फिरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
तसेच अनेक दुकानातील व्यावसायिकांना ग्राहकाला मास्क असेल तरच प्रवेश देण्याबाबत सूचना करण्यात आल्या. तिसरी लाट आपल्या महापालिका क्षेत्रात येऊच नये आणि अन्य मार्गाने त्याचा प्रसार होऊ नये यासाठी आतापासूनच खबरदारी घेतली जात आहे. महापालिका क्षेत्रात कोरोना संसर्ग पसरू नये यासाठी नागरिकांनी मास्क परिधान करणे बंधनकारक आहे, तसेच सोशल डिस्टन्स पाळणे आणि सॅनिटायझरचा वापर करने आवश्यक असून कोणीही व्यक्ती विनामास्क फिरताना आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशारा मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.