हुतात्मा राष्ट्र बंधु राजीव भाई दीक्षित जयंती व पुण्यतिथी स्वदेशी भारत सन्मान पुरस्कार वितरण आणि काव्य संमेलनसोहळा
काल मंगळवार दि. ३०/११/२०२१ रोजी आसू, फलटण या ठिकाणी हुतात्मा राष्ट्र बंधु राजीव भाई दीक्षित जयंती व पुण्यतिथी स्वदेशी भारत सन्मान पुरस्कार वितरण आणि काव्य संमेलनसोहळा आनंदात पार पडला.. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे व उद्घाटक श्रीमंत शिवरूप राजे निंबाळकर उर्फ बाळराजे खर्डेकर, मा. सभापती पंचायत समिती फलटण, अध्यक्ष श्री. अरविंदभाई मेहता आणि काव्य संमेलनाध्यक्ष श्री. हनुमंत चांदगुडे अशा मान्यवरांची तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून श्री. जीवन इंगळे, ह. भ. प. पुरुषोत्तम महाराज हिंगणकर, श्री प्रमोद झांबरे तसेच कवितासंग्रह, बालकवितासंग्रह, निबंधस्पर्धा, काव्यलेखनस्पर्धा ( लहान गट, मोठा गट) यामधून पुरस्कार मिळालेले आणि काव्यसंमेलनास आलेल्या कवी कवयित्रींची उपस्थिती लाभली.
सर्व पुरस्कृत कवी कवयित्रींना रोपटे, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून आलेल्या सर्व कवी कवयित्रींनी आपल्या कवितेचे सादरीकरण करून कार्यक्रमात रंगत आणली.
सौ भारती सावंत यांना निबंध स्पर्धा 'माझ्या स्वप्नातील भारत' याविषयावरील निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक आणि किलबिल या बालकवितासंग्रहाला तृतीय क्रमांकाने पुरस्कृत केले गेले.
काव्य संमेलनानंतर भोजनाचा लाभ घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
कार्यक्रमातील सर्व धावपळीचे श्रेय मा. प्रकाश सकुंडे गुरुजी आणि आसू गावातील सर्व कार्यकर्त्यांना जाते.त्यांच्या अथक परिश्रमाने हा सोहळा आनंदात पार पडला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.