एकात्मिक बाल विकास सेवा योजना खानापूर विटा प्रकल्पांतर्गत अंगणवाडी सेविका, मिनी सेविका व मदतनीस पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन
सांगली, दि. 29, : एकात्मिक बाल विकास सेवा योजना खानापूर विटा प्रकल्पांतर्गत एकूण 19 अंगणवाडी सेविका, एक मिनी सेविका व 3 मदतनीस यांची पदे रिक्त आहेत. ही मानधनी रिक्त पदे भरण्यासाठी स्थानिक महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र उमदेवारांनी त्यांचे अर्ज एकात्मिक बाल विकास सेवा योजना खानापूर विटा कार्यालयात दि. 31 डिसेंबर 2021 ते दि. 13 जानेवारी 2022 पर्यंत साक्षांकित प्रतिसह पोहोच करावेत, असे आवाहन खानापूर पंचायत समिती विटा चे बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.
अंगणवाडी सेविका व मिनी सेविका पदासाठी शैक्षणिक पात्रता किमान 10 वी पास तर मदतनीस पदासाठी किमान 7 वी पास आहे. दि. 13 जानेवारी 2022 रोजी वय वर्षे 21 वर्षाच्या वरील व 32 वर्षाच्या आतील असावे. महिला उमदेवार ही त्या गावची स्थानिक रहिवाशी असावी. या पदासाठी लहान कुटूंबाची अट लागू राहील. या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता इतर अनुषंगिक पात्रता याबाबतचा सविस्तर तपशील दर्शविणारा नमुना अर्ज संबंधित ग्रामपंचायत, पंचायत समिती व बाल विकास प्रकल्प कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर उपलब्ध आहे.
अंगणवाडी सेविका रिक्त पदे असलेल्या ग्रामपंचायतीचे नाव व कंसात अंगणवाडी केंद्र क्रमांक पुढीलप्रमाणे. करंजे (08 (भिवघाट)), कुर्ली (52), बामणी (56), कार्वे (60), जखीनवाडी (38), खंबाळे (भा) (71), गावठाण भेंडवडे (83), सागर भेंडावडे (85), लेंगरे (100), हिंगणगादे (106), भाग्यनगर (112), देविखींडी (122), चिखलहोळ (113), गार्डी (133), गार्डी (134), गार्डी (135), ढवळेश्वर (131), बेणापूर (15), चिंचणी (54). या अंगणवाडीमध्ये प्रत्येकी एक या प्रमाणे एकूण 19 रिक्त पदे भरावयाची आहेत. तर भिकवडी बु. (भवरवाडी (18) या अंगणवाडीमध्ये एक अंगणवाडी मिनी सेविका पद रिक्त आहे. तसेच वाळूज (93), हिंगणगादे (107) व वासुंबे (139) या अंगणवाडीमध्ये प्रत्येकी एक मदतनीस पद रिक्त आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.