Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीतील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे पुर्ण झालेले स्मारक नागरिकांसाठी लवकर खुले करा अन्यथा नागरिकांच्या हस्ते उदघाटन करून स्मारक खुले करू..! भाजपा दिपक माने.

सांगलीतील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे पुर्ण झालेले स्मारक नागरिकांसाठी लवकर खुले करा अन्यथा नागरिकांच्या हस्ते उदघाटन करून स्मारक खुले करू..!  भाजपा दिपक माने.


सांगली 1 डिसेंबर 21 :-
सांगलीतील राजवंश सोसायटीमधील अद्यावत असे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक महापालिकेने कोट्यावधी रुपये खर्च करून उभारले आहे. समस्त बहुजन समाजाचे प्रेरणास्थान राजमाता अहिल्यादेवी होळकर आहेत. गेली कित्येक वर्ष झालं या स्मारकाचे काम चालू होते या ठिकाणी अद्यावत असे उद्यान ,राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे चरित्रपट तैलचित्राच्या माध्यमातून  उभे केले आहे. ते जनतेने पाहिल्यास अहिल्यादेवी यांचे महान कार्य दिसुन येते. विद्यार्थीसाठी लायब्ररी , पुण्यश्लोक आहिल्यादेवी चा पुतळा , सभामंडप असे विविध सोयी सुविधा उभे केले आहे.

सदर स्मारकास आज भेट देऊन पाहणी केली.सदर स्मारक  पूर्ण होऊन एक वर्षांहून अधिक कालावधी झाला आहे सांगलीतील जनता हे स्मारक कधी जनतेसाठी खुले होईल त्याची वाट बघत आहे. काही लोकांनी मोठ्या नेत्यांच्या  हस्ते उद्घाटन करण्याचा हट्ट धरला आहे. पण नेत्यांच्याकडुन यांना वेळ मिळत नसल्याने बहुजन समाजातील जनता यात वेठीस धरली जात आहे. महापालिकेच्या खर्चाने उभारलेले स्मारकापासुन  व त्याच्या सोयीसुविधा पासून जनता वंचित राहत आहे.. 

 आज आयुक्त नितीन कापडणीस यांना अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे लवकरात लवकर उद्घघाटन करून सर्वसामान्य जनतेसाठी खुले करा या मागणीसाठी निवेदन देण्यात आले. अन्यथा नागरिकांच्या हस्ते स्मारकाचे उद्घघाटन करून जनतेसाठी ते खुले करण्यात येईल. असा इशारा भारतीय जनता पार्टीच्या वतीने देण्यात आला.  यावेळी अल्पसंख्यांक प्रदेश चिटणीस आश्रफ वानकर , ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अमर पडळकर ,अनुसूचित जाति मोर्चा उपाध्यक्ष महेश सागरे , ओबीसी युवा मोर्चा अध्यक्ष राहुल माने उपस्थित होते


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.