Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं खरमरीत भाषेत पत्र, राज्यपाल दुखावले, म्हणाले...

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं खरमरीत भाषेत पत्र, राज्यपाल दुखावले, म्हणाले...


मुंबई: हिवाळी अधिवेशनात विधानसभाध्यक्षांच्या निवडणूक कार्यक्रमाला मंजुरी देण्यावरुन महाविकासआघाडी सरकार आणि राज्यपालांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली होती. राज्यपालांना विनंती करुनही त्यांनी निवडणुकीला मंजूरी न दिल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी त्यांना खरमरीत भाषेत पत्र पाठवले होते. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळातील कायदे आणि नियम राज्यपालांच्या अधिकार कक्षेत येत नाहीत, याकडे लक्ष वेधले होते. मुख्यमंत्र्यांची पत्रातील ही भाषा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी  यांच्या चांगलीच जिव्हारी लागली. त्यामुळेच राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना नव्याने पाठवलेल्या पत्रात आपली नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली आहे.

राज्यपाल पत्रात नेमकं काय म्हणाले?

या पत्रात वापरण्यात आलेली भाषा योग्य नाही. हे पत्र वाचून मी खूप दु:खी, व्यथित आणि निराश झालो आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मला पाच वाजता पत्र पाठवण्यात आले. त्यानंतर लगेच एका तासात मंजूरी द्यावी, अशी मागणी सरकारने केली. हा माझ्यावर एकप्रकारे दबाव आणण्याचा प्रकार आहे. मी घटनेच्या चौकटीत राहून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी बांधील आहे. मला जो काही निर्णय घ्यायचा आहे, तो योग्य असला पाहिजे. सर्व बाबींचा विचार करुन मला निर्णय घ्यावा लागतो. यासाठी तुम्ही माझ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणू शकत नाही.

विधानसभेचा सभापती निवडीची प्रक्रिया सुरु करण्यासाठी सुमारे ११ महिन्यांचा काळ घेतल्याविषयीही राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली. नियम सहा आणि सातमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात आल्या आहेत. या दूरगामी परिणाम करणाऱ्या सुधारणांचे परिणाम कायदेशीररित्या तपासले जाणे आवश्यक आहे. त्यासाठी मला संविधानतज्ज्ञांशी चर्चा करणे आवश्यक आहे. तसेच मी विधानसभेच्या विशेषाधिकारांवर कधीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले नव्हते. विधानसभाध्यक्ष निवडणुकीच्या कार्यक्रमाला मंजुरी देण्यासाठी माझ्यावर दबाव आणला जाऊ शकत नाही. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यासाठी घटनेतील कलम २०८ चा गैरवापर करण्यात आला. ते घटनाबाह्य आहे. त्यामुळे मी सध्या विधानसभाध्यक्षाची निवडणूक घेण्यास अनुमती देऊ शकत नाही, असे राज्यपालांनी पत्रात नमूद केले आहे.


उद्धव ठाकरेंच्या पत्रात काय म्हटलं होतं?

विधिमंडळातील कायदे आणि नियम राज्यपालांच्या अधिकार कक्षेत येत नाहीत. नियमातील बदल हे कायदेशीर आहेत की नाही हे तपासण्यासाठी अनावश्यक वेळ घेऊ नये.

कुलगुरु निवडीचे अधिकार काढून घेतल्याने राज्यपाल संतापले?

अलीकडेच विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या निवडीतील राज्यपालांच्या अधिकारांना कात्री लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यामुळे राज्यपाल संतप्त झाले आहेत. त्याबद्दल राज्यपाल कोश्यारी यांनी छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे रविवारी नापसंती व्यक्त केली होती


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.