Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कर्मवीर पतसंस्था सहकारात ग्राहक सेवेत अग्रभागी राहील :- श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील इस्लामपूर शाखेचा ३ रा वर्धापन दिन साजरा.

कर्मवीर पतसंस्था सहकारात ग्राहक सेवेत अग्रभागी राहील :- श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील इस्लामपूर शाखेचा ३ रा वर्धापन दिन साजरा.


इस्लामपूर:- कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या., सांगली च्या इस्लामपूर शाखेचा ३ रा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने साजरा झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील होते.

स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी केले. त्यांनी संस्थेच्या सांपत्तीक स्थितीची आढावा सादर केला. संस्थेचे संपूर्ण कामकाज ऑनलाईन कोअर बँकींग असून संस्थेच्या ठेवी ६०८ कोटी आहेत तर संस्थेने रुपये ४६५ कोटीचे कर्ज वाटप केले आहे. संस्थेचे भागभांडवल रु. २६ कोटी ७५ लाख आहे. संस्थेचा स्वनिधी ५८ कोटी आहे. संस्थेची गुंतवणूक १८८ कोटी आहे. संस्थेस सतत ऑडीट वर्ग अ आहे. संस्थेचा निव्वळ एन पी ए शुन्य टक्के आहे. संस्थेची सभासद संख्या ४५००० इतकी आहे. संस्थेचे प्रशस्त आधुनिक मुख्यालयाचे सांगली येथे काम अंतिम टप्प्यात असून हे कार्यालय पतसंस्थाच्या क्षेत्रात वेगळेपण निर्माण करील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

 आपल्या भाषणांत श्री. पाटील म्हणाले की सर्वोत्तम ग्राहक सेवा हा आमचा ध्यास आहे. त्यामध्ये आधुनिक सेवेवर आमचा भर राहील संस्थेच्या ५१ शाखामधुन जाताना तेथील सभासदांनी दिलेला विश्वास आमच्या कार्याला बळ देत आहे असे ते म्हणाले. त्या सर्व सभासदांनी त्यांनी धन्यवाद दिले. या प्रसंगी प्रा. शिंदे अॅड. अभिजीत परमणे, गणेश देवाडिगा, सुहास माने, श्री. बांदल, संतोष मोकाशी भरत पाटील, कैलाश शेळके आदि सभासदांनी आपले मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.


या वेळी नुतन सल्लागार म्हणून डॉ. युवराज शांतीनाथ पाटील श्री. नंदकुमार केशवराव पवार श्री. सतिश महावीर शेटे श्री. सिकंदर बाबालाल मुजावर श्री. प्रकाश हिंदुराव शिंदे, श्री भरत आण्णा पाटील यांची नेमणूक करून त्यांचा सत्कार करणेत आला.

या प्रसंगी प्रमुख उपस्थित म्हणुन संतोष मोकाशी आर बी माने अवधुत पेठकर नितीन सुतार, रविंद्र सुर्यवंशी रमेश सुर्यवंशी यांचे सह मोठया प्रमाणात सभासद हजर होते.

या कार्यक्रमास संस्थेच्या व्हाईस चेअरमन श्रीमती भारती चोपडे संचालक अॅड एस.पी. मगदूम डॉ. नरेंद्र खाडे, डॉ. रमेश वसंतराव ढबू, अं. के. चौगुले, लालासो भाऊसो थोटे, संचालिका सौ. ललिता अशौक सकळे, तज्ञ संचालक डॉ. एस. बी. पाटील (मोटके) मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल श्रीपाल मगदूम उपस्थित होते. आभार संस्थेचे संचालक श्री. वसंतराव धुळाप्पाण्णा नवले यांनी मानले सुत्रसंचालन संजय सासणे यांनी केले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.