मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवार ३ रोजी सांगलीत पत्रकार व कुटुंबीयांची नेत्रतपासणी जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी व पदाधिकार्यांची माहिती
शुक्रवार दिनांक 3 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत डॉ दिलीप पटवर्धन यांच्या नंदादीप नेत्रालय च्या एसटी स्टँड रोड पारख मेडिकल समोरच्या शाखेत ही तपासणी पार पडणार आहे. आमदार सुधीर दादा गाडगीळ, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, डॉ माधवी दिलीप पटवर्धन, अध्यक्ष आयएमए सांगली, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष शिवराज काटकर आणि मान्यवरांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन होणार आहे.
मोफत नेत्रतपासणीतील सुविधा पुढील प्रमाणे :
• डोळ्यांचा अंतर्भाग व बाह्य भागाची तपासणी
• इंट्राऑनक्यूलर प्रेशरची मोजणी
• डोळ्यांच्या पडद्याची तपासणी
• मोतीबिंदूचे व काचबिंदूचे परीक्षण
• चष्म्याचा अचूक नंबर व
• कम्प्युटरच्या वापरामुळे होणाऱ्या परिणामांची तपासणी
संगणक आणि मोबाईलचा सातत्याने डोळ्याशी असलेला संपर्क, त्यामुळे डोळ्यावर वाढते ताण, रक्तदाब, मधुमेह यासारखे विकार यामुळे डोळ्याच्या विकारात होणारी वाढ लक्षात घेऊन सांगलीतील सुप्रसिद्ध नेत्र तज्ञ डॉ. दिलीप पटवर्धन यांच्याकडे नेत्र तपासणीची पर्वणी मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त लाभली असून त्याचा लाभ पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी घ्यावा असे आवाहन सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
मोफत तपासणी बरोबरच नंदादीप आय हॉस्पिटलमध्येच उपचार घेतल्यास खालील सवलतही दिली जाईल
1.केस पेपर तपासणी फी मोफत.
2. ऑपरेशन मध्ये 2000/- पर्यंत चे डिकाउंट.
3. तपासणी(OPD) मध्ये 10% डिस्काउंट.
4.चष्मासाठी 10% डिस्काउंट.
परगावच्या पत्रकार आणि कुटुंबियांच्या सोयीसाठी शनिवार 4 रोजीही नेत्रतपासणी शिबिर होणार आहे. त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी- विकास सूर्यवंशी, घनश्याम नवाथे, विनायक जाधव, नंदू गुरव, नरेंद्र रानडे, चिंतामणी कुलकर्णी, महादेव केदार, कुलदीप देवकुळे, किशोर जाधव, किरण जाधव, आदित्यराज घोरपडे, सलीम नदाफ, सुधाकर पाटील, प्रशांत साळुंखे आणि प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
9175100724 (नंदादीप नेत्रालय)
9850384378 (अविनाश कोळी)
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.