डॉ. शिवाजीराव कदम यांची स्वदेशी औषध उद्योग समूहास सदिच्छा भेट
श्री रावसाहेब पाटील सांगली यांच्या स्वदेशी औषध उद्योग समूहास आणि त्यांच्या “स्वदेशी व्हिला” या निवासस्थानास भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली.
डॉ. शिवाजीराव कदम यांनी स्वदेशी औषध उद्योगसमूहाच्या भेटीवेळी उद्योगसमूहाच्या उत्पादनाविषयी आणि व्यवसायासंबंधी अत्यंत आपुलकीने माहिती घेतली. उद्योगाच्या विस्तारासाठी संबंधित डॉ. शिवाजीराव कदम यांनी अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले.
याप्रसंगी त्यांनी श्री रावसाहेब पाटील यांच्या निवासस्थानी ही भेट दिली सर्व कुटुंबीयांची डॉ.कदम यांनी सहृदय चौकशी करून कुटुंबातील युवापिढीला भविष्यातील प्रगतीविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.
आपल्या अतिशय व्यस्त वेळातून त्यांनी स्वदेशी औषध उद्योग समूहास भेट दिली. त्यांच्या भेटीने उद्योग समूहातील कर्मचारी आणि श्री रावसाहेब पाटील यांच्या कुटुंबियांना उद्योग शिलतेचे प्रोत्साहन लाभले.
या सदिच्छा भेटी प्रसंगी श्री रावसाहेब पाटील यांचे स्नेही श्री भालचंद्र पाटील ,प्राचार्य डी डी चौगुले सर, श्री .सागर पाटील , श्री .हर्षद पाटील , सौ .कांचन पाटील , सौ . सोनाली पाटील , सौ तेजस्वीनी पाटील , श्री. विपुल पाटील उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.