Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भाजप आमदार नितेश राणेंना न्यायालयाचा मोठा झटका

 भाजप आमदार नितेश राणेंना न्यायालयाचा मोठा झटका


सिंधुदूर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीतील प्रचार प्रमुख शिवसेना कार्यकर्ते संतोष परब  हल्याप्रकरणी आमदार नितेश राणेंवर  आरोप करण्यात आले आहेत.

याप्रकरणी नितेश राणेंवर सध्या अटकेची टांगती तलवार आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ पहायला मिळत आहे. संतोष परब हल्ल्याप्रकरणी, नितेश राणेंना अटक व्हावी अशी मागणी करण्यात आली असून, तशी पोलिसांत तक्रार देखील दाखल केली गेली आहे. अशातच आता न्यायालयाने संशयित आरोपीना अंतरिम अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला आहे, अशी माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी मंगळवारी दिली आहे.

नितेश राणेंच्या  यांच्या अटकपूर्व जामीनावर आज (बुधवारी) सिंधूदूर्ग  न्यायालयात सुनावणी हाेणार आहे. त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष आजच्या सुनावणीकडे लागवलं आहे.

दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे  यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहेत. संतोष परब  यांच्यावर झालेल्या हल्ल्यावरून नितेश राणे यांच्यावर आरोप केले जात असून त्यामुळे नितेश राणेंना लवकरच अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.