प्रियांका यांच्या प्रचाराने भाजप अस्वस्थ; योगी आदित्यनाथ सरकारमधील मंत्र्याचा दुजोरा
नवी दिल्ली: काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी ज्या पद्धतीने महिला मतदारांची जमवाजमव करीत आहेत, त्याने भाजपमध्ये घबराट निर्माण झाली आहे, याला योगी आदित्यनाथ मंत्रिमंडळातील एका मंत्र्यांनीच दुजोरा दिला आहे.
भाजपही यादृष्टीने प्रयत्न करीत आहे. मागच्या निवडणुकीत महिला मतदारांनी भाजपला जोरदार पाठिंबा दिला होता, असे सांगताना या मंत्र्यांनी दबक्या आवाजात मान्य केले की, प्रियांका गांधी राज्यातील महिला मतदारांत स्थान निर्माण करण्यात यशस्वी होताना दिसत आहेत. प्रयागराजमध्ये पंतप्रधान मोदी यांनी आपले भाषण महिलांवर केंद्रित केले. बचत गट योजना सुरू करून त्यांनी एक हजार कोटी रुपये महिलांच्या बँक खात्यात जमाही केले. मातृशक्ती, महिला सशक्तीकरण असे शब्दप्रयोग करून महिलांसाठी योगी-मोदी सरकार किती गंभीर आहे, हे सांगण्यात आले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.