Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दोन हजाराचे आमिष देऊन शिक्षकानेच केला अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार

 दोन हजाराचे आमिष देऊन शिक्षकानेच केला अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार


वर्धा : दोन हजाराचे आमिष देऊन अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकानेच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना तक्रारीनंतर उघडकीस आली आहे.

ही घटना तालुक्यातील धुमनखेडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत घडली असून या प्रकरणातील आरोपी शिक्षकावर पोस्को तसेच भादंविच्या विविध कलमान्वये समुद्रपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे.

शिक्षक दीपक मंडलिक रा. हिंगणघाट याने २ डिसेंबरला पीडितेला वगळता वर्गातील सर्व विद्यार्थिनींना सुट्टी दिली. तर वर्गखोलीत असलेल्या पीडितेला गणित सोडवण्यास सांगितले. दरम्यान, आरोपी शिक्षक दीपक याने पीडितेच्या हातात दोन हजार रुपये देऊन तुझ्याशी लग्न करायचे आहे असे म्हणत तिच्याशी अश्लील चाळे केले. घाबरलेल्या पीडितेने अशाही परिस्थितीत स्वत:ला सावरत शिक्षकाने दिलेले पैसे फाडून थेट दीपकच्या तोंडावर फेकून वर्गखोलीतून पळ काढला.


घाबरलेल्या पीडितेने तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराची माहिती कुटुंबीयांना दिल्यावर पीडितेच्या कुटुंबीयांनीही शिक्षकाला विचारणा केली. त्यावेळी आरोपी शिक्षकाने चूक झाल्याचे कबूल करून माफी मागितली. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी सदर प्रकार गंभीर असल्याने थेट समुद्रपूर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी आरोपी शिक्षक दीपक मंडलिक (४०) रा. हिंगणघाट याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कदम, समुद्रपूरचे ठाणेदार प्रशांत काळे यांच्या मार्गदर्शनात सहा. पोलीस निरीक्षक धनश्री कुटेमाटे, पोलीस उपनिरीक्षक राम खोत, रंजना झिलपे, प्रेम देव, सराटे, दीपक वानखेडे करीत आहेत.

पीडिता शाळेत जाण्यास द्यायची नकार

दोन हजाराचे आमिष देऊन शाळेतील शिक्षकाकडूनच अश्लील चाळे करण्यात आल्याने पीडिता ही चांगलीच घाबरली होती. कुटुंबीयांनी शाळेत जा असे म्हणताच ती शाळेत जाण्यासाठी थेट नकार देत होती. कुटुंबीयांनी पीडितेला विश्वासात घेऊन विचारपूस केल्यावर सदर धक्कादायक प्रकार उजेडात आला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.