Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दक्षिण भारत जैन सभेचा 'डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण सेवा पुरस्कार कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा) यांना जाहीर

दक्षिण भारत जैन सभेचा 'डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण सेवा पुरस्कार कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा) यांना जाहीर


जीवनगौरव पुरस्कार स्व. बापूसाहेब सावंताप्पा बोरगावे यांना सभेच्या शंभराव्या अधिवेशनात होणार पुरस्कार वितरण रावसाहेब पाटील (दादा) सांगली दि. २६: महाराष्ट्रचे माजी मंत्री, माजी खासदार व सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, आर्थिक, धार्मिक व सहकार क्षेत्रात गेली साठ वर्षे भरीव कामगिरी केलेले कल्लाप्पाण्णा आवाडे दादांना दक्षिण भारत जैन सभेचा प्रतिष्ठित असा डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षणसेवा पुरस्कार तर जैन समाजाच्या अल्पसंख्याक दर्जा लढ्यात आणि सभेच्या कार्यात लक्षवेधी सहभाग दिलेले स्व. बापूसाहेब सावंताप्पा बोरगावे यांना मरणोपरांत जीवन गौरव पुरस्कार देण्यात येणार असल्याचे सभेचे अध्यक्ष मा. रावसाहेबदादा पाटील यांनी इचलकरंजी येथे जाहीर केले. दोन्ही पुरस्कार सभेच्या सांगली येथे संपन्न होणाऱ्या शंभराव्या त्रैवार्षिक अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. या दोन्ही पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये, मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे आहे.


अध्यक्ष रावसाहेबदादा म्हणाले, 'आवाडे दादांनी खासदार, मंत्री, दक्षिण भारत जैन सभा व लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, सूतगिरणी, साखर कारखाना व बँकांच्या माध्यमातून भरीव कामगिरी केली आहे. त्यांच्या सार्वजनिक कामाचा सभेला अभिमान आहे. त्यांच्या कार्याची सन्मानपूर्वक नोंद घेऊन सभेच्या डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण सेवा पुरस्काराने त्यांचा दक्षिण भारत जैन सभेच्या जानेवारी २०२२ मध्ये होणाऱ्या शंभराव्या ऐतिहासिक अधिवेशनात सत्कार करण्यात येणार आहे. तसेच दक्षिण भारत जैन सभेच्या कार्यात व जैन समाजाला केंद्र स्तरावर अल्पसंख्याक दर्जा मिळावा यासाठी सभेच्या आंदोलनात अग्रभागी राहून लक्षवेधी काम केलेले स्व. बापूसाहेब सावंताप्पा बोरगावे सांगली यांना मरणोपरांत जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांच्या कुटुंबीयांना याचवेळी सन्मानित करण्यात येणार आहे. इचलकरंजी येथे आवाडे दादांच्या उपस्थितीत त्यांनी ही घोषणा केली व आवाडे दादांचा सत्कार केला.


यावेळी सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील, चेअरमन रावसाहेबनाना पाटील, व्हा. चेअरमन दत्ता डोलें, मुख्यमहामंत्री अजित पाटील, खजिनदार संजय शेटे, सहखजिनदार पा. पा. पाटील, उपाध्यक्ष पोपटराव डोर्ले महामंत्री शांतीनाथ नंदगावे व सौ. विमल पाटील, अजित खंजिरे, उत्तम आवाडे, राहुल खंजिरे, माजी महापौर सुरेश पाटील, डॉ. अण्णासाहेब चोपडे, सुदर्शन हेरले, प्रा. एन. डी. बिरनाळे, रवींद्र देवमोरे, रवींद्र पाटील, तिर्थंकर माणगावे, श्रेणिक मगदूम, कबनूर व इचलकरंजी येथील सात जैन मंदिर कमिटीचे ट्रस्टी व सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी, बोरगाव परिसरातील सभेच्या शाखांचे पदाधिकारी व अधिवेशन समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो : १) मा. खा. कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा) यांचा सत्कार करताना सभेचे अध्यक्ष श्री. रावसाहेब आ. पाटील (दादा) सोबत भालचंद्र पाटील, रावसाहेब जि.पाटील, उत्तम आवाडे, सुरेश पाटील, दत्ता डोर्ले, कुंतिलाल पाटणी, रविंद्र पाटील, डॉ. अजित पाटील, एन.डी. बिरनाळे आदि मान्यवर

२) मा. खा. कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा) ३) स्व. बापूसाहेब सावंताप्पा बोरगावे


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.