Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ई-चालान भरले नसेल तर दाखल होणार खटले

ई-चालान भरले नसेल तर दाखल होणार खटले


चंद्रपूर : वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर ऑनलाईन चालान पाठविले असल्यास त्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. थकीत चालान असणाऱ्यांविरुद्ध थेट न्यायालयात खटला दाखल करण्यात येणार आहे.

चंद्रपुरात आता दंड वसूल करण्यासाठी न्यायालयातून नोटीस पाठवून लोकअदालतीमध्ये हजर राहण्यास सांगितले जात आहे.

वाहनचालकांना शिस्त लागावी, यासाठी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येते. जानेवारी ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीत वाहतूक पोलिसांंनी ९६ हजार ५५१ जणांवर कारवाई करीत ई-चालान दिले. त्यापैकी ३९ हजार २०४ जणांंनी ९१ लाख आठ हजार ७०० रुपयांचे चालान भरले. तर ५७ हजार ३४४ जणांकडे एक करोड ७५ लाख ५४ हजार ७०० रुपयांचा दंड शिल्लक आहे. वाहनचालकाला दुसऱ्यांदा पकडल्याशिवाय ताे दंड भरत नाही. त्यामुळे दंडाची रक्कम वाढत जाते. त्यामुळे आता वाहतूक पोलिसांकडून दंड न भरणाऱ्या वाहनचालकांवर न्यायालयात खटले दाखल करण्याची मोहीम सुरू केली आहे.

४०००० वाहनचालकांवर भरणार खटले

ज्यांच्याकडे दंड थकीत आहे. अशा सुमारे ४० हजार वाहनचालकांची माहिती न्यायालयाला देण्यात आली आहे. त्यांना न्यायालयाने ११ नोव्हेबरच्या लोकअदालतीमध्ये उपस्थित राहण्याचे नोटीस पाठविली आहे. लोकअदालतीमध्ये जे वाहनचालक चलान भरणार नाही त्यांच्यावर खटले भरविण्यात येणार आहे.


माझ्या वाहनावर दंड आहे का?

- अनेक चालकांना आपल्या वाहनावर काही दंड आहे का, असा प्रश्न सतावतो. मात्र आपण घरबसल्या याची माहिती मिळवू शकतो. महाट्रॅफिक ॲप डाऊनलोड करून माय व्हेईकलमध्ये जाऊन तेथे आपल्या वाहनाचे रजिस्ट्रेशन करायचे. तेथे असलेल्या माय इ-चलान येथे आपण आपल्या वाहनावरील दंड बघू शकतो. पे इ-चलानमधून थकीत पेमेंट भरता येते.शंका असेल तर तेथे असलेल्या गिव्ह रिजनमध्ये तक्रार नोंदवू शकतो. 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.