Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अखेर ओमिक्राॅनवर उपाय सापडला, शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

 अखेर ओमिक्राॅनवर उपाय सापडला, शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश


मुंबई : पाश्चिमात्य देशात सध्या मोठ्या प्रमाणावर ओमिक्राॅन  रूग्णसंख्या वाढत आहे. अनेक देशामध्ये आता आरोग्य व्यवस्था मोडळीस आल्या आहेत. भारतात सध्या ओमिक्राॅन रूग्णसंख्या इतर देशांच्या तुलनेत कमी आहे.मात्र, कोरोना रूग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारची चिंता वाढली आहे.

केंद्र सरकार ओमिक्राॅनच्या वाढत्या रूग्णसंख्येबाबत गंभीर असल्याचं दिसत आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारे आक्रमक पाऊल उचलत आहेत. अशातच आता दिलासादायक माहिती समोर आली आहे.

आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या एका टीमने शरिरातील काही अँटीबॉडीजचा शोध लावला आहे, ज्या ओमिक्रॉनसह कोरोनाचे सर्व प्रकार निष्प्रभ करू शकतात. या अँटीबाॅडीज शरिरातील काही भागांवर थेट हल्ला करतात.

ज्या भागांमध्ये उत्परिवर्तन होत असतानाही कोणताही बदल होत नाही, त्या भागांवर या अँटीबाॅडी परिणाम करतात. युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनचे असोसिएट प्रोफेसर डेव्हिड वेइसलर यांनी याबाबत माहिती दिली आहे.

कोरोनाच्या स्पाईन प्रोटीनद्वारे विषाणू मानवी शरिरात प्रवेश करतो. त्यानंतर त्याचा संसर्ग मानवी शरिरात होतो. याच स्पाईन प्रोटीनला लक्ष्य करणाऱ्या काही अँटीबाॅडीज शरिरात असतात.

या लक्ष्य करणाऱ्या अँटीबाॅडीजला विकसीत केलं तर कोरोनाला नियंत्रणात आणलं जाऊ शकतं, असं असोसिएट प्रोफेसर डेव्हिड वेइसलर यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, कोरोना लसीचा बुस्टर डोस हा या अँटीबाॅडीज विकसीत करू शकतात, असंही डेव्हिड वेइसलर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता लसीकरण वाढवण्याची गरज असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.