जनधन खातेदारांची आनंदाची बातमी; सरकारच्या वतीने मिळणार १० हजार रुपये
जनधन बँकेत खाते असणाऱ्यांसाठी भारत सरकारच्या वतीने आनंदाची बातमी देण्यात आली आहे. जनधन खाते असणाऱ्या खातेधारकांना सरकारच्या वतीने अनेक योजनांचा फायदा मिळत असतो. केंद्र सरकारच्या वतीने झिरो बँक बॅलन्स असणाऱ्यांसाठी जनधन बँक खात्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.
त्यामुळे सर्वानाच हा पर्याय सोयीस्कर पडतो.
जनधन बँक खात्यात बॅलन्स नसला तरी सरकारच्या वतीने ओव्हरडराफ्टची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे आपल्या खात्यात बँक बॅलन्स नसला तरी आपल्याला १०,००० रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध होणार आहे. आधी ही सुविधा ५००० रुप्यापर्यंतच उपलब्ध होती, ती आता वाढवून १०,००० रुपयांपर्यंतच्या घरात गेली आहे.
प्रधानमंत्री जनधन खात्यात आपल्याला १०,००० रुपयांपर्यंतचा फायदा हवा असेल तर आपले खाते कमीत कमी ६ महिने जुने असायला हवे. अन्यथा आपल्याला फक्त २००० रुपयांचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. जनधन खाते उघडण्यासाठी खात्यात बँक बॅलंसच असावा अशी काही गरज नाही. आपल्या खात्यात सरकारच्या वतीने कमी व्याजदरावर १०००० रुपये मिळू शकतात.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.