जागतिक एड्स दिनानिमित्त सुंदरनगर वेश्या वस्तीतील वारांगना महिलांनी कॅडलमार्च: मास्क वापरण्याचा संदेश देत केले कोरोनापासून दूर राहणेचे प्रबोधन
सांगली ; सांगलीत जागतिक एड्स दिनानिमित्त सुंदरनगर वेश्या वस्तीतील वारांगना महिलांनी कॅडलमार्च करत एड्स दिन साजरा केला. वेश्या वस्तीत 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन साजरा करण्याची प्रथा अध्यक्ष अमिरबी शेख यांनी सुरू केली होती. आजही एड्स दिनी येथील वारांगना महिलांनी वेश्या वस्तीतच कॅडल मार्च करीत एकमेकींना एड्सपासून दूर राहण्याबरोबर कोरोना पासून बचाव करण्याचा संदेश दिला.
यावेळी सर्वच वारांगना महिलांनी हातात मेणबत्त्या प्रजवलीत करीत एड्स हटावच्या घोषणा दिल्या तर कोरोना जनजागृती करणारे फलक हातात घेऊन या महिलांनी कोरोना बाबत जनजागृती केली. सामाजिक कार्यकर्ते जमीर कुरणे आणि दीपक चव्हाण यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.