Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पृथ्वीराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम सायकली वाटप, वह्या भेट देणार : रक्तदान, बेघरांना ब्लँकेट वाटप करणार

पृथ्वीराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम सायकली वाटप, वह्या भेट देणार : रक्तदान, बेघरांना ब्लँकेट वाटप करणार


सांगली, दि. ३० : कॉंग्रेसचे सांगली शहर जिल्हा अध्यक्ष, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, तसेच गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टचे संस्थापक पृथ्वीराज ( बाबा ) पाटील यांचा ३१ डिसेंबर २०२१ रोजी वाढदिवस आहे. यानिमित्ताने रक्तदान शिबीर, सायकली वाटप, अन्नदान, वह्या वाटप,  ब्लँकेट वाटप आणि चारा वाटप असे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.

वाढदिवसानिमित्त कोणीही हार, पुष्पगुच्छ आणू नयेत, त्याऐवजी गरीब आणि  गरजू मुलांच्या शिक्षणासाठी वह्या, पुस्तके आणावीत. शुभेच्छा म्हणून  कार्यकर्तेही वह्या घेऊन येतील. बाबाप्रेमी मंडळींनीही वह्या आणाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.  

श्री पाटील यांच्या वसंत कॉलनीतील निवासस्थानाजवळ पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्यावतीने आणि सिव्हिल हाॅस्पिटलच्या सहकार्याने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

काँग्रेसच्या ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष अशोकसिंह राजपूत यांच्यावतीने जिल्हा परिषद शाळेतील गरीब, गरजू मुला-मुलींना सायकलींचे वाटप करण्यात येणार आहे.

माजी नगरसेवक सच्चिदानंद कदम यांच्यावतीने श्री. पाटील यांची लाडूतुला करण्यात येणार आहे. त्यानंतर लाडू आणि चिवडा याचे वाटप गोरगरीब लोकांना करण्यात येणार आहे.

फूटपाथवर थंडीत कुडकुडणाऱ्या बेघर बांधवांसाठी ब्लँकेट वाटप करण्यात येईल. राजेंद्र कांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. अप्पासाहेब पाटील माजी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष यांच्या वतीने अनाथाश्रमात जेवण वाटप करण्यात येणार आहे. 

गणेश मार्केटमधील आजारी जनावरांना व्यापारी असोसिएशनच्यावतीने चारा वाटप करण्यात येईल. गणेश कोडग, आदित्य घोरपडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या उपक्रमाचे आयोजन केले आहे.

येथे होईल शुभेच्छा कार्यक्रम

वाढदिवसानिमित्त शुभेच्छा स्वीकारण्यासाठी 31 डिसेंबर 2021 रोजी श्री. पृथ्वीराज पाटील हे सांगलीत वसंत कॉलनीतील निवासस्थानी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत आणि दुपारी ४ ते सायंकाळी ७ पर्यंत उपस्थित राहणार आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.