राज्यातील 'हे' शहर ओमायक्रॉनचा हॉटस्पॉट
मुंबई : जगभरात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं कहर सुरु आहे. कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत.भारतातही या व्हेरिएंटने मोठ्याप्रमाणात शिरकाव झाला आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत.
ओमायक्रॉन चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत, भारतातील ओमायक्रॉन रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. देशाने ओमायक्रॉनचा ३०० चा टप्पा गाठला आहे, देशात आतापर्यंत १५ राज्यांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्र राज्यात ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण मोठ्याप्रमाणात आढळून आले आहेत. देशात महाराष्ट्रमध्ये ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण आहे, महाराष्ट्र ओमायक्रॉन आतापर्यंत ८८ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
राज्यातील पुणे जिल्ह्यातील पिंपरी ओमायक्रॉनचा हॉटस्पॉट बनत आहे. गेल्या 24 तासांत पिंपरीत 7 नव्या ओमायक्रॉन रुग्णांची भर पडली आहे. मागील 15 दिवसांत पिंपरीत तब्बल 19 रुग्ण आढळले आहेत. तर राज्यातील पिंपरी-चिंचवड, उस्मानाबाद आणि नवी मुंबईत या भागात मोठाप्रमाणात रुग्ण सापडले होते.
राज्याच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. राज्यात गेल्या २४ तासात २३ ओमायक्रॉनबाधितांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे राज्यात ओमायक्रॉन आतापर्यंत ८८ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर राज्यात पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.