राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वतीने आयुक्तांना अग्निशमन विभागा बाबत निवेदन देण्यात आले
मिरज येथील गणेश नगर असिड गोदामात लागलेल्या आगीत चार पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत याचे कारण काय? मिरज येथे लागलेल्या आगीच्या ठिकाणी मिरज फायर स्टेशनकडे कार्यरत असलेले अधिकारी कर्तव्यावरच नव्हते की काय? ज्यावेळी आगीच्या ठिकाणी फायरची गाडी उशिरा पोहोचली.अग्निशमन विभागाकडील केमिकल मारले असते तर ती आग लगेच वीझली असती व पोलिसांना झालेल्या जखमा पासून रोखता आल असत. मारलेल्या पाण्यामुळे जो स्पोट झाला त्या स्पोटाने इतर नागरिकांच्या व पोलिसांच्या जीवितास धोका निर्माण झाला असता तर कोणाच जबाबदार धरले असते? आमची एवढीच मागणी आहे मिरज फायर स्टेशन मध्ये नेमणुकीस असलेले अधिकारी मिरजेला पूर्णवेळ कार्यरत आहे काय? याची आयुक्ताने समक्ष पाहणी करून खातरजमा करून घ्यावी .
गोदामात लागलेला आगी वेळी मिरजेचे तसेच मुख्य अग्निशमन अधिकारी वेळेत घटनास्थळी हजर न राहिल्याने एवढी मोठी दुर्घटना घडल्याने याची चौकशी करून असल्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्वरित निलंबित करावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली शहर जिल्हा चिटणीस जैलाब शेख यांनी उपायुक्त रोकडे साहेबना समक्ष भेटून निवेदनाद्वारे केली.यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष भीमराव बंगलोरे,बहुजन समाजवादी पार्टीचे मिरज शहराध्यक्ष सलिम आतार,शिवराज कर्मचारी सेना मिरज शहर अध्यक्ष प्रशांत ढंग,मिरज शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस रुपेंद्र जावळे व सामाजिक कार्यकर्ते शंकर कांबळे,फारूक पठाण अधिक कार्यकर्ते उपस्थित होते
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.