परदेशातून महापालिका क्षेत्रात आले 99 प्रवासी: 51 जणांशी संपर्क.
सांगली: ओमियोक्रॉम व्हेरिन्टच्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर परदेशातून सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका क्षेत्रात एकूण 99 प्रवासी आल्याची नोंद आहे. यापैकी महापालिकेच्या वैद्यकीय पथकाकडून आत्तापर्यंत 51 जणांशी संपर्क करण्यात आला असून यापैकी 11 प्रवासी आणि त्यांच्या जवळच्या संपर्कातील 5 जण अशा 16 जणांची आर्टिपीसीआर टेस्ट करण्यात आली आहे. मनपाकडून 20 टिमद्वारे उर्वरित प्रवाशांशी संपर्क साधण्याचे काम सुरू असून मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशानुसार मनपाची वैद्यकीय यंत्रणा अलर्ट झाली आहे.
परदेशातून महापालिका क्षेत्रात आलेल्या 99 प्रवाशांची माहिती महापालिका प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी या सर्व प्रवाशांशी संपर्क साधून माहिती घेणेचे आदेश दिले होते. यामध्ये लंडन, दुबई, कतार, यूएसई, जपान या भागातून प्रवासी आल्याचे समजल्यानंतर नोडल ऑफिसर वैभव पाटील यांच्या नेतृत्वाखाली 20 वॉर्डात एकूण 20 टिम आणि 60 आरोग्य कर्मचारी यांच्या माध्यमातून परदेशातून आलेल्या प्रवाशांचा शोध सुरू करण्यात आला आहे. परदेशातून आलेल्या एकूण 99 प्रवाशांपैकी 51 जणांशी संपर्क झाला असून त्यातील 11 प्रवासी आणि 5 जवळच्या संपर्कातील 16 जणांचे आर्टीपीसीआरचे नमुने घेण्यात आले आहेत. 99 पैकी 35 प्रवासी हे यापूर्वीच परतले आहेत. संपर्क झालेल्या 11 प्रवासी आणि जवळच्या संपर्कातील 5 अशा 16 जणांना वैद्यकीय पथकाच्या निगराणीखाली ठेवण्यात आले असून दोन दिवसात आर्टिपीसीआरचा रिपोर्ट आल्यानंतर याबाबत पुढील निर्णय घेणेत येईल अशी माहिती डॉ वैभव पाटील यांनी दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.