Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आपले कार्य महापालिकेकडे पोहचवा आणि सन्मान मिळवा: 6 जानेवारीपर्यंत आपली माहिती पाठवा: महापालिकेचे आवाहन

आपले कार्य महापालिकेकडे पोहचवा आणि सन्मान मिळवा: 6 जानेवारीपर्यंत आपली माहिती पाठवा: महापालिकेचे आवाहन


सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात  सर्वेक्षण सर्व्हेक्षण 2022 आणि माझी वसुंधरा आणि  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ज्या संस्था व्यक्ती या स्वच्छ भारत अभियानासाठी मनपाक्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहेत अशा संस्थांचा महापालिका सन्मान करणार आहे. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या संकल्पनेतून उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा सन्मान करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

या उपक्रमांतर्गत मनपाक्षेत्रात स्वच्छ भारत अभियान व स्वच्छता क्षेत्रासाठी काम करणाऱ्या संस्था आणि व्यक्ती यांचा सन्मान केला जाणार आहे. यासाठी इच्छुकांनी आपले कार्य महापालिकेकडे पोहोचवा व सन्मान मिळवा असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

यासाठी स्वच्छ भारत अभियानामध्ये जुलै 2021 ते आज अखेर केलेल्या कामगिरीचा अहवाल हार्ड कॉपी किंवा गुगल फॉर्मद्वारे महापालिकेकडे पाठवायचा आहे. यासाठी 

Google Form Link: https://forms.gle/83j9Vi2RcKgth6bNA यावर ६ जानेवारी २०२२ पर्यंत आपल्या कार्याची माहिती पाठवू शकता तसेच संपर्क मेल म्हणून swachhsmkc@gmail.com व ७०३००००२३९

यावर आपण अधिक संपर्क साधून माहिती घेऊ शकता. चांगली कामगिरी केलेल्या व्यक्ती अथवा संस्था यांना महानगरपालिका मार्फत प्रशस्तीपत्र देवून सन्मान त्यांचा समान करण्यात येईल. यासाठी सर्व नागरिक, स्टार्टअप, उद्योजक/उद्योगधंदे

धार्मिक संस्था/सांस्कृतिक संस्था, सामाजिक संस्था यामध्ये सहभागी होऊ शकतात असेही महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. जे नागरिक उद्योजक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक संस्था यामध्ये सहभागी होऊ इच्छितात त्यांनी 6 जानेवारी 2022 पर्यंत आपली माहिती गुगल फॉर्मवर जमा करावी आणि त्याची सॉफ्ट कॉपी/ हार्ड कॉपी ही महापालिकेच्या सिटी कमांड सेंटर (स्वच्छ सर्व्हेक्षण कक्ष) , मंगलधाम इमारत, दुसरा मजला , मोडक हॉस्पिटल समोर, पुष्कराज चौक, सांगली या ठिकाणी कार्यालयीन वेळेत जमा करावी असे आवाहन आरोग्यधिकारी डॉ. रवींद्र ताटे यांनी केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.