Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अफ्रिकेतून महाराष्ट्रात आलेले 6 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह

 अफ्रिकेतून महाराष्ट्रात आलेले 6 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह


डोंबिवली, मुंबई, भाईंदर, पुणे या भागांतून प्रत्येकी एक आणि पिंपरी चिंचवड क्षेत्रातील दोन अशा सहा प्रवाशांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह असून त्यांचे प्रयोगशाळा नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठवण्यात आले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून ही माहिती देण्यात आली असून या प्रवाशांना ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झाला आहे की नाही हे या चाचणीनंतरच स्पष्ट होऊ शकेल.या सर्व प्रवाशांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं दिसून येत असल्याचंही आरोग्य विभागाने सांगितलं. स्थानिक प्रशासन आता या प्रवाशांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेत आहे.गेल्या महिन्याभरात परदेशी प्रवास करून आलेल्या नागरिकांनी आरोग्य विभाग किंवा स्थानिक प्रशासनाला आपल्याविषयी माहिती द्यावी असंही आवाहन राज्य सरकारने केलं आहे.

26 नोव्हेंबरला जागतिक आरोग्य संघटनेने दक्षिण अफ्रिका आणि इतर काही देशांत आढळलेल्या कोव्हिड-19 विषाणूच्या व्हेरिएंटला ओमिक्रॉन असं नाव दिलं. हा विषाणू 'व्हेरिएंट ऑफ कंसर्न' म्हणजेच काळजी करण्याजोगा विषाणू असल्याचंही नमूद करण्यात आलं आहे.या पार्श्वभूमीवर भारतातही आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या असून महाराष्ट्रात परदेशी प्रवाशांवर विशेष लक्ष देण्यात येत आहे.

मुंबईमध्ये दररोज लाखो प्रवासी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून शहरात प्रवेश करत असतात. त्यामुळे कोरोनाची लक्षण आढळणाऱ्या प्रवशांबाबत खबरदारी घेण्यात येत आहेत.

आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी केंद्र सरकारनेही नवीन नियमावली जारी केली आहे.

राज्यात खरंतर 1 डिसेंबरपासून प्राथमिक शाळा सुरु होणार होत्या मात्र ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्याची तारीख स्थानिक प्रशासनाने पुढे ढकलली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.