Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पत्नीच्या नावाने आजच उघडा 'हे' स्पेशल अकाऊंट, दर महिना मिळतील 44,793 रुपये

 पत्नीच्या नावाने आजच उघडा 'हे' स्पेशल अकाऊंट, दर महिना मिळतील 44,793 रुपये


नवी दिल्ली :  तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावावर न्यू पेन्शन सिस्टम  अकाऊंट उघडू शकता. एनपीएस अकाऊंट पत्नीला 60 वर्षाचे वय पूर्ण झाल्यानंतर एकरकमी रक्कम देईल.

सोबतच दरमहिना तिला पेन्शनच्या रूपात रेग्युलर इन्कम सुद्धा मिळेल. इतकेच नव्हे, एनपीएस अकाऊंटसह तुम्ही हे सुद्धा ठरवू शकता की, पत्नीला दरमहिना किती पेन्शन  मिळेल. यामुळे तमुची पत्नी 60 वर्षाच्या वयानंतर पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहणार नाही. या स्कीमबाबत सविस्तर जाणून घेवूयात…

या योजनेत दर महिना किंवा वार्षिक पैसे जमा करू शकता. केवळ 1,000 रुपयांनी सुद्धा पत्नीच्या नावावर NPS अकाऊंट उघडू शकता. 60 वर्षाच्या वयात NPS अकाऊंट मॅच्युअर होते. नवीन नियमांतर्गत पत्नीचे वय 65 वर्षाचे होईपर्यंत सुद्धा एनपीएस अकाऊंट  चालवू शकता.

45 हजारपर्यंत मासिक इन्कम

उदाहरण समजून घ्या -

जर तुमच्या पत्नीचे वय 30 वर्ष आहे आणि तुम्ही तिच्या एनपीएस अकाऊंटमध्ये दर महिना 5000 रुपयांची गुंतवणूक करत आहात. जर गुंतवणुकीवर वार्षिक 10 टक्के रिटर्न मिळत असेल तर 60 वर्षाच्या वयात तिच्या अकाऊंटमध्ये एकुण 1.12 कोटी रुपये होतील. तिला यापैकी 45 लाख रुपये मिळतील. याशिवाय दर महिना 45,000 रुपयांच्या जवळपास पेन्शन मिळण्यास सुरूवात होईल. सर्वात विशेष गोष्ट ही आहे की पेन्शन आजीवन मिळत राहील.


किती मिळेल पेन्शन?

वय - 30 वर्ष

गुंतवणुकीचा कालावधी - 30 वर्ष

मंथली काँन्ट्रीब्यूशन - 5,000 रुपये

गुंतवणुकीवर अंदाजित रिटर्न - 10 टक्के

एकुण पेन्शन फंड- 1,11,98,471 रुपये (मॅच्युरिटीवर काढू शकता रक्कम)

एन्युटी प्लान खरेदी करण्यासाठी रक्कम - 44,79,388 रुपये

अदाजित एन्युटी रेट 8 टक्के - 67,19,083 रुपये

मंथली पेन्शन - 44,793 रुपये.

फंड मॅनेजर करतात अकाऊंट मॅनेजमेंट

NPS केंद्र सरकारची सोशल सिक्युरिटी स्कीम  आहे. या स्कीममध्ये तुम्ही जे पैसे गुंतवता, त्याचे व्यवस्थापन प्रोफेशनल फंड मॅनेजर करतात. केंद्र सरकार या प्रोफेशनल फंड मॅनेजर्सला याची जबाबदारी देते.

यामुळे एनपीएस गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित असते. मात्र, या स्कीममध्ये तुम्ही जे पैसे गुंतवता, त्यावर रिटर्नची कोणतीही गॅरंटी नसते. फायनान्शियल प्लानर्स नुसार, एनपीएसने सुरुपासून आातपर्यंत वार्षिक सरासरी 10 ते 11 टक्के रिटर्न दिला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.