250 हून अधिक कुत्र्यांच्या पिल्लांची हत्या करणार्या त्या माकडांना अखेर पकडलं
बीड : तीन महिन्यांपासून जिल्ह्यात कुत्रा आणि माकडांमध्ये भांडण सुरू असल्याचं वृत्त समोर आलं आहे. यासंबंधी 250 हून अधिक पिल्लांची हत्या करणाऱ्या दोन माकडांना वन विभागाच्या टीमने पकडलं आहे.
त्या गावातील काही कुत्र्यांनी एका माकड्याच्या पिल्लाला जीवे मारल्यानंतर हे गँगवॉर सुरू झालं होतं. तब्बल 250 कुत्र्याच्या पिल्लांची हत्या करणाऱ्या दोन माकडांना वन विभागाने पकडलं आहे. बीडमधील वन अधिकारी सचिन कांड यांनी सांगितलं की, बीडमधील कुत्र्यांची हत्या करणाऱ्या दोन माकडांना नागपूरच्या वन विभागाच्या टीमने पकडलं आहे.दोन्ही माकडांना नागपूर पाठवण्यात आलं आहे आणि जवळच्या जंगलात यांना सोडण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीडमधील लावून गावात माकडांनी कुत्र्यांवर हल्ला करीत त्याच्या पिल्लांची हत्या करीत होते. हे माकडं पिल्लांना उंच झाडांवर किंवा घरांवर नेत जमिनीवर फेकून देत होते. एका स्थानिकाने एएनआयला सांगितलं की, गेल्या 2 ते 3 महिन्यात अशा घटना वारंवार समोर आल्या आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.