Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील 207 नागरिकांना गुंठेवारी प्रमाणपत्राचे वाटप

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील 207 नागरिकांना गुंठेवारी प्रमाणपत्राचे वाटप : मनपा आयुक्त नितीन कापडणीस आणि प्रशासनाचे नागरिकांनी मानले आभार: अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या गुंठेवारी प्रस्तावांना मान्यता : नागरिकांनी नियमितीकरनासाठी पुढे

यावे : आयुक्त कापडणीस यांचे आवाहन


सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील 207 नागरिकांना आज गुंठेवारी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. अनेक वर्षानंतर आपल्या जागेचे नियमितीकरण झाल्याने मनपा आयुक्त नितीन कापडणीस आणि प्रशासनाचे नागरिकांनी आभार मानले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या गुंठेवारी प्रस्तावांना मान्यता देण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले तर गुंठेवारीतील नागरिकांनी नियमितीकरनासाठी पुढे

यावे असे आवाहन यावेळी आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे. 

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून गुंठेवारीत राहणाऱ्या नागरिकांनी नियमितीकरण करण्यासाठी प्रस्ताव दाखल केले होते मात्र त्यांच्या प्रस्तावाबाबत दिरंगाई होत होती. यामुळे आयुक्त नितीन कापडणीस यांनी पुढाकार घेत दोन दिवसीय गुंठेवारी नियमितीकरण शिबिर घेतले होते. या शिबिरात 600 प्रस्ताव दाखल झाले होते. दाखल प्रस्तावांची छाननी सहायक संचालक नगर रचना झगडे , नगर रचनाकार आणि उप अभियंता यांच्या टीमने कमी वेळात जलद गतीने करून देत जलदगतीने छाननीचे काम पूर्ण करीत 207 प्रस्तावांची छाननी पूर्ण केली आहे. या 207 मंजूर प्रस्तावातील नागरिकांना आज त्यांच्या जागेचे गुंठेवारी नियमितीकरण करण्यात आलेचे प्रमाणपत्र 

प्रदान करण्यात आले. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्याहस्ते या

गुंठेवारी नियमितीकरण प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी उपायुक्त राहुल रोकडे, सहायक संचालक विनय झगडे, नगररचनाकार एन एन मुल्ला , आर व्ही काकडे, संजय धर्माधिकारी 

, कनिष्ठ अभियंता यासीन मंगळवार , अण्णासाहेब मगदूम, सहायक नगर रचनाकार अविनाश बने, प्रतीक डोळ, वैभव वाघमारे, आझम जमादार, रवी भिंगारदिवे, अल्ताफ मकानदार, संजय कांबळे,  श्याम गेजगे, प्रसन्न भोसले

यांच्यासह टीम उपस्थित होती. यावेळी अनेक वर्षानंतर आपल्या जागेचे नियमितीकरण झाल्याने नागरिकांनी आयुक्त कापडणीस आणि नगर रचना विभागाच्या टीमचे अभिनंदन करीत समाधान व्यक्त केले.

दरम्यान 

अनेक वर्षांपासून गुंठेवारी नियमितीकरण करण्याचे प्रस्ताव हे संबंधित विभागात प्रलंबित होते. नागरिकांची वारंवार मागणी होत होती. त्यामुळे विशेष शिबीर लावून तातडीने हे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. तरीही ज्या नागरिकांनी अद्याप गुंठेवारी नियमितीकरणाचे पैसे भरले नाहीत त्यांनी लवकरात लवकर पैसे भरून आपले नियमितीकरण प्रमाणपत्र प्राप्त करावे असे आवाहन मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.