आयुष्य संस्थेकडून महापालिका शाळांना 20 हजार वह्यां प्रदान : मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्याहस्ते वह्यांचे विदयार्थ्यांना वाटप : महापालिका शाळाना आणखीन सक्षम करण्यासाठी दानशूर व्यक्ती संस्था यांनी मदतीसाठी पुढे यावे : मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांचे आवाहन
सांगली: आयुष्य संस्थेकडून मनपा शाळा क्रमांक 29 चा एक वर्ग डिजिटल बनविला जाणार : आयुष्य संस्थेचे अध्यक्ष अमोल पाटील यांची माहिती कुपवाड येथील आयुष्य सेवाभावी संस्थेकडून सांगली महापालिका शाळांना 20 हजार वह्यां प्रदान केल्या आहेत. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्याहस्ते या वह्यांचे मनपा शाळातील विदयार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले. यावेळी महापालिका शाळाना आणखीन सक्षम करण्यासाठी दानशूर व्यक्ती संस्था यांनी मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे तर याला प्रतिसाद देत आयुष्य संस्थेकडूनच मनपा शाळा क्रमांक 29 चा एक वर्ग डिजिटल बनविण्याची घोषणा आयुष्य संस्थेचे अध्यक्ष अमोल पाटील यांनी या कार्यक्रमात केली.
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात असणाऱ्या महापालिका शाळांची गुणवत्ता वाढावी आणि पटसंख्या वाढावी साठी मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. शासनाच्या माझी वसुंधरा अभियान आणि स्वच्छ सर्व्हेक्षण 2022 अंतर्गत मनपा शाळांमध्ये विविध उपक्रम राबविले जात आहेत. मनपा शाळांच्या इमारतीपासून ते मुलांच्या बुद्धीमते पर्यंत सर्व काही बाबी या महापालिका प्रशासनाकडून पुरवल्या जात आहेत. याचबरोबर मनपा शाळेतील मुलांना अत्याधुनिक शिक्षण देण्याबरोबर त्यांना स्पर्धात्मक उपक्रमासाठी तयार करण्याचे कामही मनपा शाळातील शिक्षक करत आहेत. या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे महापालिका शाळातील पटसंख्या 700 ने वाढली असून अजूनही विद्यार्थी पालकांचा मनपा शाळांकडे ओढा पाहायला मिळत आहे. मनपा शाळांमध्ये लागणाऱ्या आवश्यक साहित्यासाठी यापूर्वीही मनपा आयुक्त कापडणीस यांनी सामाजिक संस्था, व्यक्ती यांना आवाहन केले होते. यालाच प्रतिसाद देत कुपवाड येथील आयुष्य सेवाभावी संस्थेने त्यांना आलेल्या सीएसआर निधीतून 20 हजार वह्या या महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेत आज या 20 हजार वह्यांचे विद्यार्थ्यांना वाटप केले. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्याहस्ते या वह्यांचे शाळा क्रमांक 1 च्या विदयार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले. यावेळी उपायुक्त चंद्रकांत आडके, शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी पोपट मलगुंडे, लेखापाल गजानन बुचडे, सहायक कार्य अधिकारी सतीश कांबळे, समन्वयक तात्यासाहेब सौन्दते, आयुष्य संस्थेचे प्रमुख अमोल पाटील, संचालक महावीर पाटील, संचालक संतोष चौगुले, महावीर पाराजे पाटील, अविनाश पवार अजित कांबळे चिंतामणी पवार सुरज शेख आदी उपस्थित होते.
दानशुरानी शाळा विकासासाठी पुढे यावे : आयुक्त नितीन कापडणीस
मनपाच्या शाळांमध्ये आता गुणवत्ता पूर्वक शिक्षण दिले जात असल्याने अनेक विदयार्थी हे अनेक परीक्षा तसेच स्पर्धेत चमकदार कामगिरी करत आहेत. शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक शाळांना डिजिटल बनवण्याचा आमचा संकल्प आहे. यासाठी दानशूर व्यक्ती, संस्था यांनी वस्तू स्वरूपात मदतीसाठी पुढे आल्यास महापालिका शाळा अधिक सक्षम करण्यासाठी मोठी मदत होणार आहे. त्यामुळे शाळा विकासासाठी सर्वानी मदतीचा हात पुढे करावा असे आवाहनही मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.
आयुष्यकडून शाळा क्रमांक 29 चा एक वर्ग केला जाणार डिजिटल : अमोल पाटील
यावेळी आयुष्य सेवाभावी संस्थेकडून शाळा क्रमांक 29 चा एक वर्ग डिजिटल करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. डिजिटल वर्गासाठी लागणाऱ्या सर्व वस्तूसाहित्य हे आयुष्यकडून दिले जाईल आणि एक आदर्श डिजिटल वर्ग बनवण्यामध्ये आयुष्य आपले योगदान देईल अशी घोषणा आयुषच प्रमुख अमोल पाटील यांनी यावेळी केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.