महानगरपालिकेच्या मध्यवर्ती निदान केंद्राच्या सेवा सुविधेचा आतापर्यंत 1332 नागरिकांनी घेतला लाभ: मध्यवर्ती निदान केंद्र नागरिकांना ठरत आहे वरदान: नागरिकांनी सेवेचा लाभ घ्यावा: आयुक्त नितीन कापडणीस यांचे आवाहन
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या मध्यवर्ती निदान केंद्राच्या सेवा सुविधेचा आतापर्यंत 1332 नागरिकांनी लाभ घेत सुविधेबाबत समाधान व्यक्त केले आहे. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या संकल्पनेतून साकारलेले महापालिकेचे मध्यवर्ती निदान केंद्र नागरिकांसाठी एक वरदान ठरले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा महापालिकेच्या त्रिकोणी बागेच्या पिछाडीस असणाऱ्या मध्यवर्ती निदान
केंद्रात ओढा वाढला आहे. खासगी लॅबपेक्षा अत्यल्प आणि परवडणारे दर येथे असल्याने सर्वसामान्य नागरिकांनी महापालिकेच्याच निदान केंद्रालाच पसंदी दिली आहे.
महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांच्या संकल्पनेतून त्रिकोणी बागेत असणाऱ्या एका जुन्या इमारतीचे रूपांतर अत्याधुनिक मध्यवर्ती निदान केंद्रात केले. या मध्यवर्ती निदान केंद्रात नागरिकांच्या आरोग्याशी निगडित 63 हुन अधिक तपासण्या या खासगी तपासणी केंद्रापेक्षा अल्पदारात केल्या जात आहेत. एकाच इमारतीत सर्व तपासण्या आणि एक्सरेची सोय सुद्धा असल्याने नागरिकांनी महापालिकेच्या या केंद्राला अधिक पसंदी दिली आहे. 9 आक्टोबर 2021 पासून सुरू असणाऱ्या मध्यवर्ती निदान केंद्रात मागील 50 दिवसात 1332नागरिकांनी भेट देऊन प्रत्यक्ष लाभ घेतला आहे. यामध्ये या काळात 1263 जणांच्या स्पॉट टेस्ट करण्यात आल्या आहेत तर 8225 इतक्या महालॅबच्या माध्यमातून तपासण्या करण्यात आल्या आहेत. याकाळात 894 नागरिकांचे एक्सरे काढण्यात आले आहेत. अत्यंत अल्प दरात माफक सेवा महापालिकेच्या केंद्रात उपलब्ध असल्याने हे केंद्र सर्वसामान्य जनतेसाठी एक पर्वणी ठरली आहे.
9 आक्टोबर ते एकूण 30 नोव्हेंबर 2021 अखेर या केंद्राचे 1,51,780 इतके उत्पन्न झाले आहे. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय लांघी, उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त चंद्रकांत आडके, आरोग्यधिकारी डॉ सुनील आंबोळे, डॉ रवींद्र ताटे यांच्या सूचनेनुसार
मध्यवर्ती केंद्राचे केंद्रप्रमुख काका हलवाई, नोडल ऑफिसर डॉ वैभव पाटील यांच्यासह अन्य 7 जणांची टीम उत्कृष्ठपणे काम करीत आहे. खासगी लॅबमध्ये असणारे तपासणी दर आणि महापालिकेच्या मध्यवर्ती निदान केंद्राचे दर यामध्ये मोठी तफावत असल्याने नागरिकांनी मध्यवर्ती निदान केंद्रालाच अधिक पसंदी दिल्याचे दिसून येत आहे.
मध्यवर्ती निदान केंदात अल्पदरात तपासण्या: नागरिकांनी लाभ घ्यावा: कापडणीस
महापलिकेच्यावतीने त्रिकोणी बागेच्या पिछाडीस सुरू करण्यात आलेल्या मध्यवर्ती निदान केंद्रात 63 प्रकारच्या तपासण्या या अल्पदरात करण्याची सोय आहे. महालॅबच्या सहयोगाने या ठिकाणी अनेक तपासण्या माफक दरात केल्या जात आहेत. खासगी लॅबच्या तुलनेत येथील दर अत्यंत कमी असल्याने या केंद्राचा सर्वानी लाभ घ्यावा असे आवाहन मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.