Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुण्यात खळबळ! आधी 12 वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार, मग अल्पवयीन तरुणीवर गॅंगरेप

 पुण्यात खळबळ! आधी 12 वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार, मग अल्पवयीन तरुणीवर गॅंगरेप


पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे या आरोपींनी या मुलीवर बलात्कार केला त्याच आरोपींनी काही दिवसापूर्वी एका 12 वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचाही उघडकीस आला आहे.

या तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवेली तालुक्यातील डोणजे भागात अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रकार घडला.

निलेश नेटके, लक्ष्मण पाटील यांच्यासह तीन अल्पवयीन आरोपी या प्रकरणात सहभागी आहेत. पाच जणांनी मिळून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पुण्यातील सहकारनगर पोलिसांना यातील एक आरोपी तळजाई परिसरात संशयास्पद रित्या फिरताना दिसला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली असता त्याच्या मोबाईलमध्ये त्यांना एक अश्लील क्लिप सापडली होती.

यामध्ये आरोपीने एका बारा वर्षे मुलासोबत अनैसर्गिक कृत्य केलं होतं. त्यानंतर त्यांना अटक करून त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशी अल्पवयीन मुलीवर गॅंगरेप केल्याचं प्रकरण उघडकीस आले. हवेली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.