Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू; 'या' 10 मुद्द्यावरून अधिवशेन गाजणार?

 उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू; 'या' 10 मुद्द्यावरून अधिवशेन गाजणार?


मुंबई: राज्याचं हिवाळी अधिवेशन  बुधवारी म्हणजेच उद्यापासून सुरू होणार आहे. यंदा हे अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईला होणार आहे. 22 ते 28 डिसेंबर या दरम्यान होणारं अधिवेशन सात दिवसांचं वाटत असलं तरी हे अधिवेशन केवळ शनिवार आणि रविवारमुळे 5 दिवस होणार आहे.

अशातच हे अधिवशेन वादळी ठरण्याची शक्यता आहे. विरोधकांनी सरकारला घेरण्याची पुर्ण तयारी केलेली आहे.

उद्यापासून सुरू होणाऱ्या या अधिवेशनात ओबीसी आरक्षणाचा विषय चांगलाच गाजण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली होती. तसेच गेल्या काही दिवसांपासून पेपर फुटीचा मुद्दा चांगलाच गाजला आहे. यावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच परीक्षांना होणारा विलंब यावर देखील भाजप आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे.

अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या विषयावर देखील चर्चा होऊ शकते. यावर ठोस भूमिका घेण्याची मागणी विरोधक करू शकतात. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या वीज कनेकश्न कापण्यावर देखील सरकार घेरलं जाऊ शकतं. तसेच राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या मदतीवर देखील भाजप आक्रमक आहे. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये कपात केली होती. मात्र, राज्य सरकारने कोणतीही कपात केली नव्हती.

दरम्यान, कुलपती आणि कुलगुरूंचे अधिकार कमी करणारा कायदा आणण्याच्या तयारीत राज्य सरकार आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून गदारोळ होऊ शकतो. तसेच कोरोना काळात मोठ्या प्रमाणावर गदारोळ झालाय, असा आरोप विरोधक करत आहेत. त्यावर देखील मोठा वाद होऊ शकतो. तसेच विधानसभा अध्यक्षपदाच्या मुद्द्यावरून देखील चांगलाच कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.