Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दिल्ली टीमसमोर आल्या मुंबई NCBच्या मोठ्या चुका ;ते केवळ आर्यन खानच्या अटकेसाठी उत्सुक होते'

 दिल्ली टीमसमोर आल्या मुंबई NCBच्या मोठ्या चुका ;ते केवळ आर्यन खानच्या अटकेसाठी उत्सुक होते'


मुंबई, 07 : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा  आर्यन खानला  अटक झाल्यानंतर या प्रकरणात दररोज नवनवे अपडेट समोर येत आहेत.

आर्यनला जामीन मिळाल्यानंतर देखील काही महत्त्वाचे अपडेट समोर आले आहेत. , कॉर्डेलिया क्रूझ ड्रग प्रकरणात  मोठ्या प्रक्रियात्मक त्रुटी आढळून आल्या आहेत. याप्रकरणात कॉर्डेलिया क्रूझ छाप्यांदरम्यान NCBच्या दिल्ली टीमला मोठ्या प्रमाणात प्रक्रियात्मक त्रुटी आढळून  आल्या आहेत. एनसीबीने एसआयटी स्थापन केली आहे.

मुंबईतील प्रकरणं सेंट्रल युनिटकडे हलवण्यात आली आहे. आर्यन खान तपास प्रकरणातून समीर वानखेडेंना बाजूला करण्यात आले आहे. समीर वानखेडे यांना आर्यन खानच्या चौकशीतून हटवण्यात आले असून या प्रकरणाचा आता दिल्लीची टीम तपास करत आहे. या प्रकरणाचा तपास आता वरिष्ठ अधिकारी संजय सिंह यांच्याकडे आहे.


दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार आता या प्रकरणाच्या तपासात दिल्ली टीमला काही त्रुटी आढळून आल्या आहेत. ईशान सेहगलला अश्रू अनावर सूत्रांनी अशी माहिती दिली आहे की, दिल्ली टीमच्या मते या प्रकरणातील तपास अधिकारी नियमित छापे आणि जप्ती प्रक्रियेपासून विचलित झाले. शिवाय संपूर्ण जप्तीशिवाय क्रूझला प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली. सूत्रांच्या माहितीनुसार हे अधिकारी केवळ आर्यन खानच्या अटकेसाठी उत्सुक होते आणि त्यांनी इतर अनेकांना बोर्ड करण्याची परवानगी दिली. दिल्ली टीमसमोर आलेल्या त्रुटींमधील आणखी एक बाब म्हणजे स्कॅनर अंतर्गत आयओची भूमिका आणि चौकशीची दिशाभूल केली गेली. आर्यन खानच्या कोठडीदरम्यानची सुरक्षा हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. दिल्ली टीम करत असलेल्या चौकशीदरम्यान याबाबत सत्य समोर येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.