Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

द्राक्ष बागेवर METSAC 35%याऔषधे फवारणीमुळे बागायतदारांचे प्रचंड मोठे नुकसान

 द्राक्ष बागेवर METSAC 35%याऔषधे फवारणीमुळे बागायतदारांचे प्रचंड मोठे नुकसान

मालगांव ता.मिरज,जि.सांगली येथील द्राक्ष बागेवर शिवालिक क्रॉप सायन्स प्रा.लिमिटेड चंदीगढ या कंपनीचे Metalaxyl 35% या बुरशीनाशकांची फवारणी घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या बागांचे प्रचंड नुकसान झालेले असून शेतकऱ्यांमध्ये तणावग्रस्त आणि चिंतेचे वातावरण पसरलेले आहे.सरकार दफ्तरी पंचनामे होत आहेत.शेती तज्ञ वैज्ञानिक अभ्यास करतील.महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे (सांगली)मार्गदर्शन मिळाले. संबंधित पं.स.मिरजआणि जि.प.सांगली चे तसेच राजकीय लोकप्रतिनिधींच्या भेटी  होत असून अनेक ठिकाणहून  शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबद्दल दुःख हळहळ व्यक्त केले जात आहे.तसेच पंचक्रोशीतील सर्व शेतकऱ्यांकडून दिलासा मिळत आहे.


          शिवालिक क्रॉप सायन्स प्रा.लिमिटेड चंदीगढ या कंपनीवर योग्य ती दंडात्मक कारवाई होऊन शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळाला पाहिजे म्हणून मालगांव मधील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी दुःखातून सावरून वैचारिक पातळीवर एकत्र येऊन अखंड न्याय मिळेपर्यंत लढण्याचे धाडस दाखवले आहे त्याबद्दल शेतकऱ्यांचे कौतुक आणि त्यांना मानाचा सलाम.आजही नुकसान झाल्यापासून 10 दिवस शांतपणे संयम ठेवून एकत्र येऊन विचारमंथन करून न्याय मिळावा म्हणून नुकसान ग्रस्त सर्व शेतकरी प्रयत्नशील आहेत.शासन दफ्तरी व्यवस्थित कार्यवाही पार पडावी म्हणून सुज्ञपणे आणि विवेकाने सहकार्य करत आहेत पण जर शेतकऱ्यांना न्याय मिळण्यात विलंब किंवा वेळ काढूपणा झाला तर शेतकरी आक्रमक होऊन लढण्याचा पवित्रा घेतील असं या लढ्याचे नेतृत्व करणारे शेतकरी शिवानंद स्वामी यांनी ईशारा दिलेला आहे.ते म्हणतात--


    "आलात तर बरोबर घेऊन 

     नाही आलात बरोबर तर वगळून

     आणि कोणी आडवं आलात तर तुडवून

       आम्ही लढणार"अखंड न्याय मिळेपर्यंत......

नुकसान ग्रस्त शेतकरी गटाचे नेतृत्व करणारे शेतकरी शिवानंद स्वामी फोन नं 8421083111


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.