पूर्वांचल एक्स्प्रेसवर दिसली देशाची एअर पॉवर, पंतप्रधान मोदींची हर्क्युलस विमानातून एक्स्प्रेसवर एंट्री
लखनौ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तरप्रदेश विधानसभेच्या आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकताना पूर्वांचल एक्स्प्रेस वेचे उद्घाटन केले.
समाजवादी पक्षावर थेट निशाणा साधताना पंतप्रधानांनी मागील सरकारांनी लोकांवर अन्याय केल्याचा घणाघात केला. त्या मंडळींनी केवळ स्वतःच्या कुटुंबीयांपुरतेच काम केले. भाजपमुळे मात्र राज्यामध्ये विकासाचे युग अवतरले.यावेळी पूर्वांचल एक्स्प्रेसवर भारतीय हवाई दलाची ताकद पाहायला मिळाली. यावेळी आयोजित एअरशोमध्ये मिराज-सुखोई-जग्वार ही लढाऊ विमाने सहभागी झाली होती." मिराज-२०००" या मल्टिरोल लढाऊ विमानांनी या एक्स्प्रेस वेवर तयार करण्यात आलेल्या आपत्कालीन धावपट्टीवर लॅंडिंग केले.
याच ठिकाणी मिराजमध्ये इंधन देखील भरण्यात आले. यानंतर खास वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या "एएन-३२" या विमानातून थेट सैनिकांना महामार्गावर उतरविण्यात आले. यावेळी त्यांनीही चित्तथरारक प्रात्याक्षिके सादर केली. या एअरशोमध्ये सुखोई, मिराज, राफेल, एएन-३२, सूर्यकिरण ही लढाऊ विमाने सहभागी झाली होती. खुद्द पंतप्रधान मोदी हे यावेळी हर्क्युलस विमानातून एक्स्प्रेसवर दाखल झाले. अशा प्रकारे विमानातून एंट्री करण्याची कोणत्याही भारतीय पंतप्रधानाची ही पहिलीच वेळ आहे.
यावेळी मोदी म्हणाले की, " तीन वर्षांपूर्वी मी जेव्हा या पूर्वांचल एक्स्प्रेसवेची पायाभरणी केली होती तेव्हा मी कल्पना देखील केली नव्हती की आपण विमानातून या महामार्गावर उतरू. हा राज्याच्या विकासाचा एक्स्प्रेस वे असून उत्तरप्रदेशात उभारण्यात आलेल्या आधुनिक पायाभूत सेवांचे प्रतिबिंब त्यात दिसते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.