Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कुर्ल्यात तरुणीच्या हत्या प्रकरणाचा उलगडा, प्रेमप्रकरणातून कृत्य, दोघांना अटक

  कुर्ल्यात तरुणीच्या हत्या प्रकरणाचा उलगडा, प्रेमप्रकरणातून कृत्य, दोघांना अटक


कुर्ल्यामध्ये एका तरुणीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना काल उघडकीस आली. HDIL कंपाउंडमधल्या बंद इमारतीत तरुणीचा मृतदेह आढळून आला होता.

काही तरुण इन्स्टाग्राम व्हिडीओ शूट करण्यासाठी इमारतीत गेले असता त्यांना तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणात 2 जणांना अटक करण्यात आली आहे. यातील एक आरोपी गोवंडी तर दुसरा एक कुर्ला येथील असल्याची माहिती मिळाली आहे.

मयत मुलगी ही 18 वर्षाची आहे. तिचे आणि एका 18 वर्षाच्या मुलाचे प्रेम संबंध होते. मात्र मयत तरुणी वारंवार त्याला लग्नासाठी दबाव टाकत होती. या रागातून त्या मुलाने त्याच्या मित्रासह तिच्या हत्येचा कट रचला. 23 तारखेला तिला भेटण्याच्या बहाण्याने कुर्ला एचडीआयएल येथे बोलावले आणि तिची हत्या केली. तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे का? याचा अजून पोलीस तपास करीत आहे. अटक दोन्ही आरोपी हे 18 ते 20 वयोगटातील असल्याचे समोर आले आहे.

चित्रा वाघ यांनी व्यक्त केला संताप, आज घटनास्थळी भेट देणार

या घटनेची माहिती कळताच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी काल संताप व्यक्त केला होता. त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन म्हटलं होतं की, कुर्ला येथे एका तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे ही घटना धक्कादायक आहे. राज्य सरकारने साकीनाका प्रकरण झाल्यानंतर मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिलं होतं. मुंबई पोलिसांनी अकरा कलमी कार्यक्रम आहे जाहीर केला होता, त्याचं काय झालं? निर्जन ठिकाणी पोलिसांनी गस्त घालावी, लाइटची व्यवस्था करावी अशा सूचना केल्या होत्या मग तरीही कुर्ल्यामध्ये महिलेवर अत्याचार कसा होतो? महाविकास आघाडी सरकारला महिलांच्या सुरक्षेपेक्षा नाईट लाईफची जास्त काळजी आहे. मुंबईतल्या खड्ड्यांप्रमाणे राज्याची कायदा आणि सुव्यवस्था ही खड्ड्यात गेली आहे, असं त्यांनी म्हटलं होतं.

एकेकाळी महिलांच्या सुरक्षेसाठी ओळखली जाणारी मुंबई आता 'जंगलराज'च्या वाटेवर आहे, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली होती. आज सकाळी 11 वाजता कुर्ला येथील घटनास्थळी तसेच 11.30 वाजता विनोबा भावे पोलिस स्टेशनला भेट देणार आहे, असं चित्रा वाघ यांनी काल ट्वीट करत म्हटलं होतं.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.