Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दंडोबा या ठिकाणी पर्यटन केंद्र विकसित करण्याच्या ‘व्हिजन सांगली@७५’ फोरमच्या प्रयत्नांना यश :- सुरेश पाटील

दंडोबा या ठिकाणी पर्यटन केंद्र विकसित करण्याच्या ‘व्हिजन सांगली@७५’ फोरमच्या प्रयत्नांना यश :- सुरेश पाटील


सांगली :‘व्हिजन सांगली@७५’ फोरमने अलीकडेच सांगली जिल्ह्याच्या पर्यटन विकासाचा आराखडा विविध तज्ञ मार्गदर्शकांची मते अजमावून तयार केला आहे. दंडोबा, सागरेश्वर, चांदोली, गुढे, पाचगणी यासारखी ठिकाणे पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्याबाबत सुचविले होते. तसेच टुरिझम असोसिएशन, ट्रॅव्हल तज्ज्ञांनीही याबाबत सुचविले आहे. त्या अनुषंगाने भोसे वनग्राम समितीच्या माध्यमातून दंडोबा येथील वनविभागाची जमीन ‘पर्यटन केंद्र’ म्हणून विकसित करणेबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. त्यासाठी पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ७ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाच्या आराखड्यात मंजुरीचा निर्णय देत या वर्षीच्या नियोजन समितीमधून सदरचे कार्य करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती ‘व्हिजन सांगली@७५’फोरमचे मुख्य समन्वयक तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली. याप्रसंगी फोरमचे सेक्रेटरी राजगोंडा पाटील, वसंत पाटील, सुभाष देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.

ते म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पन्हाळ्यानजीक जेऊरयाठिकाणी एडवेंचरपार्क आणि पर्यटन केंद्र राज्य शासनामार्फत विकसित करण्यात आले असून त्यासाठी एडवेंचर पार्क मधील तज्ञ विनोद कांबोज यांनी संपूर्ण प्लॅन तयार केला आहे. त्याच धर्तीवर अशा पद्धतीचे पर्यटन केंद्र दंडोबा वनविभागाच्या जमिनीमध्ये विकसित होऊ शकते. यासाठी सांगलीतील सुप्रसिद्ध आर्किटेक्चर राहुल शेठजी यांनी याचा आराखडा तयार केला आहे.

ते म्हणाले यासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी तसेच संबंधित विभागाकडे सादर केला होता.सांगली शहरापासून अवघ्या २० कि.मी. अंतरावर असलेल्या दंडोबा येथील वनविभागाच्या २० एकर जागेमध्ये एडवेंचर पार्क या प्रकल्पासाठी ७ कोटीचा आराखडा तयार केला असून मध्ये एडवेंचर पार्क त्याचप्रमाणे १०कॉटेजेस तसेच विद्यार्थी विद्यार्थिनीसाठी डॉर्मेटरी, कॉन्फरन्स हॉल, हॉटेल्स, अॅम्पीथेटर त्याचबरोबर या एडवेंचर पार्क अंतर्गत हाय रोप कोर्स, लो रोप कोर्स, स्पोर्ट्स क्लायम्बिंग आणि रॅप्पेल्लिंग, झिप लाइन, बंगी इंजेक्शन, झोर्बिंग, पेंट बॉल, जायंट स्विंग, स्लॅक लाईन, स्काय सायकल, फ्री फॉल, जुमरींग आदी सुविधांनी युक्त असा आहे. सदर प्रकल्प भोसे वनग्राम समितीतर्फे राबविण्यात येणार असून त्यासाठी संपूर्ण सहकार्य व मार्गदर्शन ‘व्हिजन सांगली@७५’ फोरम करणार आहे.


ते म्हणाले या प्रकल्पाच्या मंजुरीसाठी मुंबई येथे पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन सदर प्रकल्पाचा आराखडा त्यांना सादर केला असता त्यांनी याबाबत जिल्हाधिकारी यांना यावर्षीच्या नियोजन समितीमधून सदरचे कार्य करण्याचे आदेश दिलेले आहेत. सांगली जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचे कुठलेही ठिकाण पर्यटनासाठी नागरिकांना उपलब्ध नाहीत. हा प्रकल्प यशस्वीपणे प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही स्वतः दंडोबाच्या डोंगरावर ३ वेळा जाऊनजंगलातफिरून त्या संपूर्ण जागेची माहिती व पाहणी केली आहे. या पद्धतीचा प्रकल्प लवकरच कार्यान्वित झाल्यानंतर सांगली परिसरातील व जिल्ह्यातील नागरिकांना एक उत्तम पर्यटन स्थळ उपलब्ध होईल. दंडोबाच्या भागांमध्ये अडीच-तीन हजार एकरावर जंगल असून वरून दिसणारा अत्यंत रम्य अशा पद्धतीचा निसर्ग त्याठिकाणी दर्शनास येतो.

ते म्हणाले पालकमंत्री जयंत पाटील यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे नजीकच्या काळात एक रम्य पर्यटनाच्या दृष्टिकोनातून एक चांगल्या पद्धतीचे पर्यटन स्थळ उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे सदर पर्यटन केंद्र विकसित झाल्यामुळे त्या भागातील शेकडो युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. भोसे ग्रामपंचायत समितीचे सरपंच विकास चौगुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्व सहकार्य करण्याचे मान्य केले आहे.सांगली जिल्हा आगामी१५ वर्षामध्ये७५ वर्षे पूर्ण करेल. तोपर्यंत सांगली जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीकोनातून विकसित करण्यासाठी आम्ही नियोजन आणि विकास करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. त्यामध्ये अनेक तज्ञ एकत्रित राहून काम करीत आहोत. त्यामुळे व्हीजन सांगली @७५ फोरमच्या वतीनेपूर्ण केलेल्या या पहिल्याच कार्याला मा. ना. जयंत पाटील यांनी मान्यता दिल्यामुळे एक महत्त्वाचा मैलाचा दगड हा आम्ही पूर्ण केल्याचा अभिमान आम्हाला आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.