Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

घटनाबाह्य सभासद वाढवून संस्था हडप करणाऱ्या लठ्ठे शिक्षण संस्था पदाधिकाऱ्यांना चाप. मे. सहधर्मादाय आयुक्तांनी मॅनेजिंग कमिटी बैठक केली रद्द..

घटनाबाह्य सभासद वाढवून संस्था हडप करणाऱ्या लठ्ठे शिक्षण संस्था पदाधिकाऱ्यांना चाप. मे. सहधर्मादाय आयुक्तांनी मॅनेजिंग कमिटी बैठक केली रद्द..



सांगली दि. १९ : संस्था हडप करण्यासाठी बेकायदेशीर सभासद वाढ मंजूर करण्यासाठी दि. १८ नोव्हेंबर रोजी संस्थेने बोलाविलेली बैठक कोल्हापूर सहधर्मादाय आयुक्तांनी रद्द केल्याची माहिती डॉ. अण्णासाहेब चोपडे यांनी दिली.

संस्था पदाधिकाऱ्यांनी मनमानी व बेकायदेशीर कामाचा सपाटा लावल्याने त्यांना विरोध करणाऱ्या चोपडे मेमोरियल ट्रस्, हौशाबाई चौगुले ट्रस्ट व मे. अरिहंत ट्रेडिंग कं. या तीन संस्थांचे सदस्यत्व बेकायदेशीरपणे रद्द करुन ही बाब न्यायप्रविष्ट असताना त्या तीन संस्थांच्या जागी माजी मानद सचिव प्राचार्य व्ही. टी. चौगुले यांची विजय चॅरिटेबल फौंडेशन, विद्यमान मानद सचिव सुहास पाटील यांचा डी. जे. पाटील ट्रस्ट, ट्रस्टी कमिटी माजी चेअरमन बाबासाहेब पाटील यांचा नेमगोंडा  पाटील ट्रस्ट अशा तीन संस्था संपन्न देणगीदार गट व विद्यमान व्हा. चेअरमन अॅड. पी. आर. पाटील यांचा पुतण्या प्रशांत पाटील यांना या गटात व्यक्तीगत सभासद म्हणून मंजूरी घेण्यासाठी दि. १८ नोव्हेंबर रोजी कार्यकारी समिती बैठक बोलावली होती. याविरुद्ध डॉ. आण्णासाहेब चोपडे यांनी मे. सहधर्मादाय आयुक्त कोल्हापूर यांच्याकडे दाद मागितली होती. त्यांच्या समोर बाजू मांडताना चोपडे यांनी.. संस्थेचे पदाधिकारी मनमानी व बेकायदेशीर कारभार करतात.. त्यांना जाब विचारणाऱ्या संस्थांचे सभासदत्व रद्द करुन आपल्याच संस्थांना सभासदत्व देऊन संस्था हडप करण्याचा कुटील डाव आहे. गेल्या साडेचार वर्षांत या पदाधिकाऱ्यांनी संस्थेचे प्रचंड मोठे नुकसान केले आहे. माजी मानद सचिवांचा संगणक खरेदी घोटाळा, विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमता व मनमानी कारभारामुळे झालेला पोषण आहार घोटाळा, श्रमिक महिला वसतिगृह प्रवेश घोटाळाप्रकरणी संस्थेला झालेला लाखो रुपयांचा दंड व भुर्दंड, संशयास्पद व नियमबाह्य नोकरभरतीत शिक्षणाधिकारी माध्यमिक सांगली यांचा अहवाल, ढासळलेली शैक्षणिक गुणवत्ता, बंद पडलेले अभ्यासक्रम, विद्यार्थी व शिक्षक संख्येत झालेली प्रचंड घट यामुळे संस्थेची मोठी पिछेहाट झाली आहे. या विरुद्ध कोणी जाब विचारु नये म्हणून शासक समितीवर बहुमत रहावे या हेतूने बेकायदेशीर नवीन सभासद करण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे दि. १८ नोव्हेंबर रोजी बोलाविलेली बैठक रद्द करावी व सभासद वाढ आणि अन्य कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्यास प्रतिबंध करणे हेच संस्थेच्या हिताचे आहे असा युक्तीवाद डॉ. अण्णासाहेब चोपडे यांनी आपली बाजू मांडताना केला. मे. सहधर्मादाय आयुक्त यांनी हे म्हणणे मान्य करुन लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या दि. १८ नोव्हेंबर २१ रोजी बोलाविलेली बैठक रद्द करुन सभासद वाढ व अन्य धोरणात्मक निर्णय घेण्यास पदाधिकाऱ्यांना मनाई केली आहे.


संस्थेला वाचविण्यासाठी हा निर्णय स्वागतार्ह असल्याचे डॉ. चोपडे म्हणाले. या निर्णयाबद्दल संस्थेच्या सभासद वर्गात समाधान व्यक्त केले जात असल्याचे बोलले जात आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.