Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बालदिन विशेष

 बालदिन विशेष



थॅलेसेमिया मुलांना प्रत्येक 15 ते 20 दिवसांनी या मुलांना रक्त चढवावे लागते अन्यथा ती जगू शकत नाहीत आशा मुलांच्या चेहऱ्यावर एक आनंद देण्याचा छोटासा प्रयत्न

14 नोव्हेंबर बालदिन या बालदिनाचे औचित्य साधून सोमवार 15 नोव्हेंबर रोजी सांगली सिव्हिल नर्सिंग हॉल या ठिकाणी मध्यवर्ती प्रयोगशाळा सांगली यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता, 

या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून उप अधिष्ठाता डॉ. गुरव सर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. नंदकिशोर गायकवाड सर, इंचार्ज सीमा चव्हाण मॅडम, डॉ. शिवपुत्र सर , हे सर्व प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते  पाहुण्यांना रोहित कदम यांनी संस्थेकडून व पेशंटच्या पालकांकडून एक निवेदन दिले होते ,सांगली मिरज मध्ये स्वतंत्र थॅलेसेमिया डे केअर सेंटर चालू करणे, पेशंटला लागणारी औषध सांगली सिव्हिल मध्ये उपलब्ध करून देणे, फेरेटिन टेस्ट उपलब्ध करणे, ब्लड बँक मध्ये कॉम्पोनंट मशिन बसवणे इ मागणी केल्यानंतर पाहुण्यांनी काही दिवसात याची लवकरच पुरतात करू असे सांगितले आहे

या कार्यक्रमाचे सर्व श्रेय हे सांगली सिव्हिल मधील मध्यवर्ती प्रयोगशाळा च्या स्टाफ यांना जातो एक आगळ्या वेगळ्या मुलांसोबत आपल्या धावपळीच्या  कामातुन वेळ काढून या थॅलेसेमिया ग्रस्त मुलांसोबत आपल्या आयुष्यातले थोडा वेळ त्यांचा जीवनात आनंद मिळवून द्यायचं काम केलेले आहेत .

सौ. शैलजा पाटील मॅडम श्री. अमोल कांबळे सर श्री पवन रास्ते या सर्वांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने कार्यक्रमाचे नियोजन केले ,तसेच मध्यवर्ती प्रयोगशाळा आणि प्रयोगशाळा विभाग यांच्याकडून या मुलांसाठी खाऊचे आणि अल्पोपहार चे वाटप करण्यात आले .

या कार्यक्रमासाठी थॅलेसेमिया निर्मूलन असोसिएशन, कोल्हापूर चे संस्थापक श्री. रोहित कदम व थॅलेसेमिया निर्मूलन असोसिएशन कोल्हापूर , शाखा सांगली चे अध्यक्ष निखिल हरोले ,सदस्य स्वप्नील कोळी हे ही उपस्थित होते. 

मुलांना खाऊ व शैक्षणिक वस्तू निस्वार्थ भावनेने दिलेल्या सामाजिक दाते 

 १) संगीता नांद्रे मॅडम ,बेळगाव  50 वाफेची मशीन

2) मिना मारू मॅडम - डॉक्यूमेन्ट फाईल, पेन,वही इ.

3) गीतांजली उपाध्ये मॅडम - राजगिरा लाडू, भडंग इ.

4)प्रशांत दिवाण सर - वही 4 डझन ,पेन 5 पॅकेट

5)वैभव चौगुले सर, भरत सकळे सर - 12 डझन + वह्या

6)संतोष जाधव सर - आभार पत्र 6 

या सर्व दात्यांनी निस्वार्थ मदतीचा हात पुढे करून सामाजिक बांधिलकी जपली सर्वांचे मनापासून आभार


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.