गौण खनिज उत्खनन व वाहतुक कार्यपध्दती निश्चित - अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख पाटील
सांगली, दि. 30, : सहसचिव महसूल व वनविभाग यांच्याकडील पत्रान्वये मे. शौर्या इन्फाटेक प्रा.लि. यांची System Integrater म्हणून नियुक्ती करण्यात आली असून राज्यात गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतुकीला प्रभावी आळा घालण्याच्या दृष्टीने तसेच राज्यातील वाहतूक परवान्यामध्ये एकसूत्रता येण्यासाठी संपूर्ण राज्यासाठी वाहतूक परवान्याचे प्रारूप निश्चित करण्यात आले आहे. तसेच सदर वाहतूक पासेस वापराबाबतची कार्यपध्दती निश्चित करण्यात आली आहे. अशी माहिती अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख पाटील यांनी दिली.
गौणखनिजाचे उत्खनन व वाहतुकीकरिता महाखनिज या संगणकीय प्रणालीचे प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले. या प्रशिक्षणास उपजिल्हाधिकारी (महसूल) मोहिनी चव्हाण, जिल्हा खनिकर्म अधिकारी अमर देवेकर, शौर्य इन्फाटेक पुणे चे प्रतिनिधी विश्वजीत चव्हाण, जिल्ह्यातील सर्व खाणपट्टाधारक, क्रशधारक व परवानाधारक उपस्थित होते.
या प्रशिक्षणामध्ये सांगली जिल्ह्यातील सर्व खाणपट्टाधारक व गौणखनिज (दगड, खडी, मुरूम, माती, क्रश सँड / वॉश सँड) खरेदीदाराने विक्रेताधारकांकडून खरेदी करण्यात आलेल्या गौणखनिजाच्या ( दगड, खडी, मुरूम, माती, क्रश सँड / वॉश सँड) अनुषंगाने खरेदीदाराची वाहतूक पासची प्रत स्वत:कडे घेतली पाहिजे व ती स्वत:जवळ जतन केली पाहिजे अशा सूचना देण्यात आल्या. तसेच मंजूर खाणपट्टाक्षेत्रामध्ये क्रशर अस्तित्वात असल्यास सदर क्रशरधारकांने गौणखनिज स्वामित्वधन भरल्याबाबतचा वाहतूक पासेसव्दारे वाहतूक करणे आवश्यक आहे. त्याव्यतिरिक्त मंजूर खाणपट्टा क्षेत्राच्या बाहेर क्रशर अस्तित्वात असल्यास सदर क्रशरमधून गौणखनिजाची वाहतूक Zero Royalty Pass उल्लेख असलेला वाहतूक पासेसव्दारे करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील सर्व खाणपट्टाधारक व परवानाधारक यांनी गौणखनिज वाहतूक करताना गाडीसोबत ऑनलाइन पध्दतीने ॲक्टीव केलेला वाहतूक पास असणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील फक्त क्रशरधारक म्हणून कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना जिल्हा कार्यालयातून विक्रेता परवाना घेणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील सर्व गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांनी सदर गौण खनिज ताडपदरीने/ ग्रीननेटने अच्छादित करून वाहतूक करणे आवश्यक असल्याच्या सूचना प्रशिक्षणामध्ये देण्यात आल्या.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.