Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू होण्याच्या आशा पल्लवित; शिक्षणमंत्र्यांचे शिक्षण आयुक्तांना आदेश

 शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू होण्याच्या आशा पल्लवित; शिक्षणमंत्र्यांचे शिक्षण आयुक्तांना आदेश


राज्यातील विविध शैक्षणिक संस्थेत १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त केलेल्या सुमारे ३५ हजार प्राथमिक व माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शासनाची जुनी पेन्शन योजना लागू होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांना नुकतेच दिले आहेत.

हा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाकडे सादर होणार असून, त्यास मंजुरी मिळाल्यास नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या अनुदानित, विनाअनुदानित, अंशतः अनुदानित, वाढीव तुकड्यावर कार्यरत प्राथमिक व माध्यमिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ होणार आहे.

शासनाने काही वर्षांपूर्वी नवीन पेन्शन योजना लागू केली आहे, परंतु ती शिक्षकांवर अन्यायकारक आहे. त्यामुळे शासनाच्या निर्णयाविरुद्ध शिक्षकांनी सातत्याने लढा उभारला आहे हा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून पेंडिंग आहे.

त्यामुळे राज्याच्या विविध विभागांतील शिक्षक आमदार, पदवीधर आमदार व विविध शिक्षक संघटनांनी वर्षानुवर्षे पाठपुरावा व आंदोलने केली आहेत.

परंतु आता आगामी निवडणुका आणि हजारो शिक्षकांची मागणी आणि मानसिकतेचा सकारात्मक विचार करून शालेय शिक्षण मंत्री आणि राज्य सरकारने हा प्रश्न निकाली काढण्यासाठी वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर सध्या तरी शिक्षकव शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन योजना लागू होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

१ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त केलेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही सरसकट जुनी पेन्शन योजना लागू व्हावी शिक्षण विभाग व राज्य शासनाने तातडीने हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त केलेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही सरसकट जुनी पेन्शन योजना लागू व्हावी, यासाठी २२ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर या कालावधीत आझाद मैदान मुंबई ते सेवाग्राम आश्रम, वर्धा अशी पेन्शन संघर्ष यात्रा राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समितीच्या वतीने काढण्यात येणार असून या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जुनी पेन्शन हक्क संघटनेचे माढा तालुकाध्यक्ष कमलाकर दावणे यांनी केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.