Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सह्याद्रीनगर रेल्वे उड्डाण पूलाच्या बांधकामासाठी वाहतुक मार्गात बदल

सह्याद्रीनगर रेल्वे उड्डाण पूलाच्या बांधकामासाठी वाहतुक मार्गात बदल


सांगली, दि. 30,  : रेल्वे उड्डाण पूल 511 (ROB 511 at Ch:272/535 at SH 154) (विश्रामबाग ते माधवनगर - जिल्हा परिषद अध्यक्ष शासकीय निवासस्थान ते रत्ना हॉटेल चौक सार्वजनिक बांधकाम विभाग विश्रामगृहा जवळ) चे नवीन बांधकाम सुरू करण्याचे असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सदर पुलावरून होणारी वाहतूक नवीन रेल्वे उड्डाण पूल (at L.C.130, SH154) (विश्रामबाग ते माधवनगर - विश्रामबाग चौक ते कुपवाड फाटा चौक) वरून वळविण्याची अधिसूचना निर्गमीत केली असून ही अधिसूचना दि. 1 डिसेंबर 2021 रोजी पासून ते पुढील आदेशापर्यंत अंमलात राहील.

जनतेच्या व वाहन चालकांच्या माहितीसाठी योग्य ठिकाणी दिशाचिन्हे व माहिती लावण्यात यावी. या उपाययोजना उममुख्य इंजिनिअर (बांधकाम), मध्य रेल्वे, सातारा यांचे कार्यालय, पोलीस अधीक्षक सांगली, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, सांगली व कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, मिरज यांनी याबाबत एकत्रितपणे कराव्यात, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जारी केले आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.