सात वर्षापासुन मोक्या गुन्हयातील फरारी आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी केले जेरबंद
मा. पोलीस अधीक्षक श्री दिक्षीत गेडाम अपर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले मॅडम सोो यांनी सांगली जिल्हयातील फरारी व पाहीजे आरोपीचा शोध मोहिम राबवणेबाबत सुचना दिल्या, त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी जिल्हयातील फरारी व पाहीजे आरोपीचा शोध कामी एक खास पथक तयार केले.
त्याप्रमाणे दिनांक १८.११.२०२१ रोजी सहा पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार, पोलीस उपनिरीक्षक दिलीप ढेरे, सपोफी अच्युत सुर्यवंशी, सिध्दाप्पा रुपनर, राजाराम मुळे, संदीप पाटील, सचिन कणप, स्नेहल शिंदे, असे शासकीय वाहनाने विटा विभागात हदीत पेट्रोलिंग करीत फरारी व पाहीजे आरोपीचा शोध घेत असताना पोकॉ/ सचिन कणप यांना खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, विटा पोलीस ठाणे भाग ५ गु.र.न ९५/२०१४ भादविस कलम ३९७ ४५७ ३४ ३९७ १०२ व सह मोक्का कायदयामधील या गुन्हयातील फरारी आरोपी रविद्र काळे हा माऊली ते खानापुर येथे बस स्टॉप समोर विटा ते मायणी रोडवर थांबला असल्याचे माहिती मिळाली. मिळाले माहिती प्रमाणे वरील पथकाने सदर ठिकाणी जाऊन त्यास शिताफीने ताबेत घेऊन त्यास उपनिरीक्षक दिलीप ढेरे यांनी त्याचे नाव गाव विचारता त्याने आपले नाव रविद्र काकडया काळे वय ५५ रा तडवळे ता खटाव जि सातारा असे सागितले. त्यावेळी त्यास पुढील तपासकामी विटा पोलीस ठाणे येथे रिपोर्टने वर्ग करण्यात आले.
सदरचे आरोपी हा विटा पोलीस ठाणे कडील मोक्याच्या गुन्हयात गेले ७ वर्षापासुन फरारी होता,
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार, पोलीस उपनिरीक्षक दिलीप ढेरे सपोफी अच्युत सुर्यवंशी, सिध्दाप्पा रुपनर, राजाराम मुळे, संदीप पाटील, सचिन कणप, स्नेहल शिदे यांनी पार पाडली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.