संविधान दिन उत्साहात साजरा
सांगली, दि. 26, : संविधान दिनानिमित्त एस. टी. स्टँड सांगली जवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे महापौर दिग्वीजय सुर्यवंशी यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक मनिषा डुबुले, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर, दलितमित्र पुरस्कार मिळालेले मान्यवर व विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे वाचन करून प्रभातफेरीची सुरूवात करण्यात आली. ही प्रभातफेरी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक एस. टी. स्टँड मार्गापासून शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महानगरपालिका इमारत मार्ग - सिटी पोस्ट मार्गे स्टेशन चौक सांगली येथे प्रभातफेरीची सांगता झाली. यावेळी स्टेशन चौक परिसरातील राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी प्रधानमंत्री कै. पंडीत नेहरू व माजी मुख्यमंत्री कै. डॉ. वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
सूत्रसंचालन ए. के. पाटील यांनी केले. सहायक आयुक्त जयंत चाचरकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमास विविध शाळांचे शिक्षक, विद्यार्थी, एनसीसी चे छात्र, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयातील कर्मचारीवृंद व विविध महामंडळातील कर्मचारी उपस्थित होते.
०००००
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.