एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कपात होण्याची शक्यता, १ डिसेंबरपासून बदलणार दर
मुंबई: एलपीजीच्या १ डिसेंबरला होणाऱ्या समीक्षेदरम्यान गॅस सिलेंडरच्या दरात कपात होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घट झाल्याने ही कपात होऊ शकते.
याशिवाय पुढील वर्षी उत्तर प्रदेश, पंजाबसह ५ राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका पाहता मोदी सरकार पेट्रोल तसेच डिझेलप्रमाणेच गॅस सिलेंडरच्या दरातही कपात करण्याची शक्यता आहे. दिवाळीपासून एक्साईज ड्युटी आणि वॅटमध्ये कपात केल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले होते.
दरम्यान, दिवाळीच्या आधी एलपीजीवर महागाईचा बॉम्ब फुटला होता. एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत २६६ रूपयांची वाढ झाली होती. दरम्यान, यातील दिलासादायक बाब म्हणजे ही वाढ कमर्सशियल सिलेंडरमध्ये झाली होती. घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आला नाही.
आजही दिल्लीत कमर्शियल सिलेंडरचे दर २ हजारांपेक्षा अधिक आहेत. आधी हा दर १७३३ इतका होता. मुंबईत १६८३ रूपयांना मिळणारा १९ किलोचा सिलेंडर १९५० रूपयांना झाला आहे. तर कोलकातामद्ये १९ किलोा इंडेन गॅस सिलेंडर २०७३.५० रूपयांचा झाला आहे. चेन्नईत आता १९ किलो्या सिलेंडरसाठी २१३३ रूपये खर्च करावे लागत आहेत.
जर घरगुती सिलेंडरबाबत बोलायचे झाल्यास दिल्लीत १४.२ किलोा विना सबसिडी गॅस सिलेंडरची किंमत ८९९.५० रूपये इतकी आहे. ६ ऑक्टोबरला या दरात वाढ झाली होता. तर एक ऑक्टोबरला केवळ १९ किलोच्या कमर्शियल सिलेंडरचे दर वाढवले होते. कोलकाता आणि चेन्नईमध्ये आताही १४.२ कोलीचा एलपीजी गॅस सिलेंडर ९१५.५० रूपयांना मिळत आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती पाहता गॅस सिलेंडर एक हजार रूपयांचा टप्पा पार करणार अशी शक्यता व्यक्त केली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.