Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दिवाळीच्या सणानिमित्त रस्त्यावरील खड्डय़ामध्ये पणतीचे दिवे लावून आ. सुरेशभाऊ खाडे यांना जनतेने दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

दिवाळीच्या सणानिमित्त रस्त्यावरील खड्डय़ामध्ये पणतीचे दिवे लावून आ. सुरेशभाऊ खाडे यांना जनतेने दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.


शहरातील बहुचर्चित छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याच्या कामासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला मुहूर्त सापडत नसल्याचे दिसत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते उदघाटन होऊन महिना दीडमहिना झाला तरी अद्याप प्रशासकीय पातळीवर कागदी घोडेच नाचविले जात आहेत. नियोजित रस्त्याचा मार्ग अतिक्रमण मुक्त करून द्या असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बजावले असतानाही विद्युत खांब आणि अतिक्रमण हटले नाहीत. महापालिका, महावितरण कंपनी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी यांच्यावर मिरज तालुक्याचे विद्यमान आमदार सुरेशभाऊ खाडे यांचे कोणतेही नियंत्रण नाही आणि त्यांचे कोण ऐकत हि नाही. त्यामुळे रस्ताकामात अडचणी उभ्या राहिल्या आहेत. प्रशासनाची उदासिनता परस्पर समन्वयाचा अभाव यामुळे छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय महामार्ग मिरजकरांसाठी स्वप्नरंजन ठरणार कि काय ? अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे. 


        आणि म्हणून दिवाळीच्या सणानिमित्त मिरज विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष प्रा. प्रमोद इनामदार यांच्या नेतृत्वाखाली गांधीचौक, मिरज येथे सायंकाळी रस्त्यावरील खड्डयामध्ये पणतीचे दिवे लावून आ. सुरेशभाऊ खाडे यांना जनतेने दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गेल्या १२ वर्षांमध्ये आपल्या आमदारकीच्या काळामध्ये मिरज शहरातील एकही रस्ता चांगल्या परिस्थितीत नाही, खड्यात रस्ता आणि रस्त्यात खड्डे अशी अवस्था मिरजकरांची निर्माण झाली आहे. आणि म्हणून अामदारांनी आपल्या हातून विकास काम होत नसेल तर आमदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी प्रा. इनामदार सरांनी केली आहे. मिरज शहरामध्ये गटारी व रस्ते यांची अवस्था, शिवाजी क्रीडांगणाची अवस्था, नागरीकांना पिण्यास स्वच्छ पाणी पुरवठा नाही, आरोग्य यंत्रणा कोसळलेली आहे, कोरोना आणि पूर यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आलेली आहे. त्यामुळे आमदार खाडे यांनी विकास कामे तर सोडाच पण प्राथमिक गरजा पूर्ण कराव्यात, १५ दिवसात शिवाजी रस्त्याचे काम सुरु न झालेस आमदार खाडेंच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार आहे अशी घोषणा प्रा. इनामदार सरांनी केली आहे.

        या आंदोलनामध्ये कार्याध्यक्ष गंगाधर तोडकर, श्री. बशीर बागवान, शकील पटेल, अविनाश कांबळे, दमयंती कांबळे, तसेच इतर महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. सदरवेळी घोषणाबाजी करणेत आली. महिलांनी आपल्या हातांनी पणतीचे दिवे शिवाजी रोडवरील खड्ड्यात लावले. आणि आमदार खाडेंना शुभेच्छा देऊन दिवाळी साजरी करण्यात आली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.