गोपाळवाडी येथे मृदंगवादक हभप किसनराव महाराज शिंदे यांचे भजनात मृदंग वादन करत असताना झाले निधन
बाळांनो "आम्ही जातो आमच्या गावा,आमचा रामराम घ्यावा"!या उक्तीप्रमाणे औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील शहापूर गावातील सर्वोत्कृष्ट भजनसम्राट, मृदंगवादक वै.हभप किसनराव महाराज शिंदे यांचे गोपाळवाडी येथे भजननाम संकीर्तनात ते स्वतःमृदंग वाजवत असताना त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका येऊन अचानकपणे त्यांचे निधन झाले;त्यांचे वय 61 होते;असा मृत्यू येणे म्हणजे जणू परमेश्वरानेच आज्ञा दिली असावी,त्यांनी अखेर देह ठेवला आणि आपल्या मृदंगवादन सेवेला कायमचाच पूर्णविराम दिला? त्यांचा मृदंग कायमचाच शांत झाला!त्यांनी अनेक धार्मिक सप्ताह,भजन कीर्तन सोहळ्यात मोफत मृदंग वादनाची अखंड सेवा बजावली.असे व्यक्तीमत्व पुन्हा होणे शक्य नाही?अनेकांना त्यांनी संस्काराची एक योग्य दिशा दिली,विशेष म्हणजे त्यांचा मुलगा विकास शिंदे हे जिल्हा परिषद शाळा गवळीशिवरा येथे आदर्श शिक्षक म्हणून कार्यरत आहेत,सून भाग्यश्री शिंदे(मोरे) जि.प.शाळा सावंगी येथे कार्यरत आहे,आणि दुसरा मुलगा दिनेश शिंदे हे एका नामांकित कंपणीत उच्च पदावर कार्यरत आहे आणि मोठा मुलगा मनोहर शिंदे हे प्रगतशील शेतकरी आहेत.असे सुंदर व्यक्तीमत्व वै.हभप किसनराव शिंदे यांनी घडविले आणि आपली सेवा नाम संकीर्तनात मृदंग वाजवत असताना त्यांचा मृदंग अचानक शांत झाला आणि त्यांनी त्यांचा देह ठेवला,त्यांच्या जाण्याने शहापूर गावात व गंगापूर तालुक्यात शोककळा पसरली,सर्व गावातील नागरिकांचे डोळे पाणावले!सर्व लोक शोक सागरात बुडाले.
(शब्दांकन:योगेश मोरे,ज्येष्ठ मराठी साहित्यिक,औरंगाबाद)
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.