Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

परदेशवारी करून आलेल्यांनी तात्काळ माहिती प्रशासनाला द्यावी - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

 परदेशवारी करून आलेल्यांनी तात्काळ माहिती प्रशासनाला द्यावी  - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी


- कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे आवाहन

- कोविडला दूर ठेवण्यासाठी कोविड योग्य वर्तन ठेवा

- लसीकरण, मास्कचा प्रभावी वापर, सोशल डिस्टन्सींग ‍त्रिसुत्रीचे काटेकोर पालन आवश्यक

सांगली, दि. 30, : कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटच्या नव्या प्रकारामुळे संसर्गाचा धोका वाढणार असून त्याला प्रतिबंध घालण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना काटेकोरपणे करणे आवश्यक आहे. त्यासाठी परदेशवारी करून आलेल्या प्रवाशांची तपासणी करणे, त्यांच्याकडे बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक आहे. तरी पदरेशवारी करून आलेल्यांनी प्रशासनाला त्वरीत माहिती द्यावी. याबरोबरच आपल्या शेजारील, आपल्या भागातील, आपल्या गावातील, आपल्या संबंधातील कोणी व्यक्ती परदेशवारी करून आल्यास नागरिकानींही याबाबतची माहिती आरोग्य यंत्रणेला द्यावी. कोरोनाशी अव्याहतपणे सुरू असलेल्या लढाईत चांगल्या प्रकारचा मास्क योग्य पध्दतीने नियमीत व सातत्याने वापरणे आवश्यक आहे. कोविड प्रतिबंधासाठी लसीचे दोन्ही डोस घेणे अनिवार्य असून ज्यांनी अद्यापही पहिला डोस घेतला नाही अशा 18 वर्षे पूर्ण झालेल्यांनी त्वरीत पहिला डोस घ्यावा. तसेच ज्यांनी पहिला डोस घेतला आहे अशांनी दुसरा डोस विहीत कालावधीत घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

आत्तापर्यंत आलेल्या कोरोना विषाणूच्या व्हेरियंटच्या तुलनेत सध्याचा ओमायक्रॉन व्हेरियंट अधिक घातक असून संसर्गही अधिक गतीने पसरवणारा आहे , असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले,  गतवेळच्या कोरोनाच्या दोन्ही लाटांचा अनुभव आपल्या गाठीशी आहे. हा अनुभव लक्षात घेता संभाव्य परिस्थितीसाठी आरोग्य यंत्रणेने सर्वोतोपरी सज्जता ठेवावी. ऑक्सिजनचा पुरेसा साठा, औषधांची उपलब्धता, अग्नीसुरक्षा यंत्रणा या सर्व दृष्टीने आवश्यक ती सर्व तयारी यंत्रणांनी करावी. कोविडला दूर ठेवण्यासाठी कोविड योग्य वर्तन, मास्कचा प्रभावी वापर, सोशल  डिस्टंन्सींग, अनावश्याक गर्दी टाळणे या सर्व बाबींचे काटेकोर पालन होणे आवश्यरक आहे. कोविड रूग्णांचे प्रमाण काहीसे कमी झाल्याअमुळे लोकांमध्ये बेसावधपणा व बेफिकीरी वाढली आहे. पण उपचारापेक्षा प्रतिबंध केंव्हाही चांगला हे तत्व अनुसरून प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी. 

यावेळी नागरिकांना आवाहन करताना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सद्याचा कोरोना ओमायक्रॉन व्हेररियंटची घातकता लक्षात घेता दुहेरी मास्कत घालणे, सर्जिकल तीन प्लाय मास्क , एन-९५ प्रकारातील मास्क घालणे आवश्यक आहे. अनावश्याक गर्दी टाळा, आवश्यक असेल तरच प्रवास करा आणि लसींचे दोन्ही डोस विहीत वेळेत घ्या, असे आवाहन त्यांनी केले आहे. 

खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी अत्यंत काटेकोरपणे काळजी घ्यावी. तसेच कोविड सदृष्य लक्षणे असणाऱ्या  प्रत्येक रूग्णांची आरटीपीसीआर चाचणी करून घ्यावी.  विशेषत: जर एखाद्याने हवाई प्रवास केला असल्यास आरटीपीसीआर चाचणी प्राधान्याने करावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.