बिल्डर्सनी घेतलाय हा मोठा निर्णय..! घर खरेदीचं स्वप्न हे स्वप्नच राहणार..?
मुंबई : सध्या वाढत्या महामाईने सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झालेय. सतत कोणत्या कोणत्या वस्तूंचे दर वाढल्याच्या बातम्या समोर येत असतात. आयुष्यात प्रत्येकाचे एक स्वप्न असते, ते म्हणजे स्वत:चे हक्काचे घर..मात्र, हे स्वप्न साकारताना अनेकांच्या नाकीनव येते. कारण, घराच्या किमती सातत्याने प्रचंड वेगाने वाढत आहेत.
घर घेण्याच्या विचारात असणाऱ्या लाेकांसाठी ही बातमी महत्वाची आहे. गेल्या काही दिवसांत पेट्रोल-डिझेल, भाजीपाला, फळांच्या किंमती वाढल्यानंतर आता पुढील वर्षात घरेही महाग होणार असल्याचे सांगण्यात येते.. स्वस्त व्याजदर नि सबसिडीवर घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी हा मोठा धक्का आहे.
देशातील सर्व राज्ये व प्रमुख शहरांमधील 13,000 हून अधिक डेव्हलपर्स आणि बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या क्रेडाई , भोपाळ यांच्यातर्फे एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार, कोरोना महामारीपूर्वीच्या 2019 च्या तुलनेत सध्या बांधकाम खर्चात 19 ते 26 टक्क्यांनी वाढ झालीय. त्यामुळे नवीन प्रकल्पांच्या किमती वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रिअल इस्टेट क्षेत्र 2017 पासून विविध समस्यांना तोंड देतेय. कोविडमुळे हे संकट आणखी वाढले. कच्चा माल आणि मजुरांच्या इनपुट कॉस्टमध्ये प्रचंड वाढ झाली. त्यामुळे घरांच्या किमती सुमारे 10 टक्क्यांनी वाढवाव्या लागू शकतात, अशी माहिती हिरानंदानी ग्रुपचे एमडी निरंजन हिरानंदानी यांनी सांगितलं.
मालमत्ता सल्लागार समूह अॅनरॉकचे अध्यक्ष अनुज पुरी म्हणाले, की इनपुट खर्चात प्रचंड वाढ होऊनही मागणी वाढविण्यासाठी विकासकांनी किमती शक्य तितक्या रोखून धरल्या होत्या. तथापि, उशिरा का होईना आता किमती वाढवाव्या लागणार आहेत. बांधकाम साहित्याच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने हा निर्णय घ्यावा लागणार आहे.
डिझेल आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या वाढत्या किमती, कुशल आणि अर्ध-कुशल मजुरांचा तुटवडा, लॉकडाऊन, उच्च मार्गदर्शक तत्त्वे आणि स्टॅम्प ड्युटी आणि व्यापक प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे बांधकाम खर्चात सुमारे एक चतुर्थांश वाढ झाल्याचे नगर नियोजक आणि मालमत्ता तज्ज्ञ मनोज सिंग मीक यांनी सांगितले.
मागील वर्षभरात कच्च्या मालाच्या किमतीत मोठी वाढ झाली. त्यामुळे घर खरेदीदारांवर त्याचा बोजा पडू शकतो. सरकार आणि संबंधित मंत्रालयांनी या समस्येकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष हर्षवर्धन पटोदिया यांनी सांगितले.
भोपाळ क्रेडाईचे अध्यक्ष नितीन अग्रवाल म्हणाले की, दोन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या प्रकल्पांमध्ये RERA मुळे किमती वाढवता येणार नाहीत. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे सरकारने या दिशेने पुढाकार घ्यावा ही विनंती..!
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.