शेतात उगवली ‘कोरोना’ सदृश्य काकडी
नवी दिल्ली : ओडिशाच्या नबरंगपूरमधील सरगुडा गावातील एका शेतकऱ्यानं दावा केलाय की, त्याच्या शेतात अशी काकडी उगवली आहे, जी दिसायला कोरोना व्हायरसच्या प्रतिरूपासारखी आहे. या काकडीचा आकार गोलाकार असून काकडीच्या आजूबाजूला काट्यासारखा आकार आला आहे.
सरगुडाचे शेतकरी चंद्रा पुजारी यांनी सांगितले की, त्यांनी या काकडीचा फोटो काढून सोशल मीडियावर शेअर केला आणि तो प्रचंड व्हायरल देखील झाला असून आणखी होत आहे.नबरंगपूर जिल्ह्यातील सरगुडा गावातील शेतकऱ्यानं या काकडीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. ही काकडी पाहण्यासाठी आता लोकांची गर्दी जमत आहे. यापूर्वी शास्त्रज्ञांनी कोरोना विषाणू कसा आहे आणि तो कसा दिसतो याबाबतचा एक फोटो शेअर केला होता आणि त्या फोटोतील कोरोना विषाणूसारखीच ही काकडी देखील असल्यानं अनेकांचे लक्ष वेधून घेतेय. त्याला खावू नका, असे कमेंटही पडत आहेत.दोन वर्षांपूर्वी कोरोना व्हायरसनं जगभरात हाहाकार माजवला होता. कोरोना महामारीच्या सुरुवातीला शास्त्रज्ञांनी विषाणूशी संबंधित एक फोटो शेअर केला होता. हा फोटो पाहून कोरोना किती धोकादायक आहे, हे सर्वांना कळलं. शास्त्रज्ञांनी शेअर केलेल्या छायाचित्रात हा विषाणू बॉलसारखा होता आणि त्यावर काटे होते. या विशेष संरचनेचा उपयोग केवळ विषाणू समजून घेण्यासाठीच नाही, तर लोकांना कोरोनाबद्दल जागरूक करण्यासाठी देखील केला गेला.
या एका शेतकऱ्यानं असाही दावा केलाय, की त्याच्या शेतात अशी काकडी उगवलीय, जी दिसायला कोरोनाच्या प्रतिरूपासारखी आहे. त्यांच्या शेतात उगवलेली काकडी गोलाकार असून काकडीच्या आजूबाजूला काट्यासारखा आकार आहे. सुरगुडा गावचे शेतकरी चंद्रा पुजारी यांनी सांगितलं, की काही कामानिमित्त मी सरगुडा गावात गेलो असता, मला ही काकडी दिली. त्यानंतर मी या काकडीचा फोटो काढून सोशल मीडियावर शेअर केला आणि तो प्रचंड व्हायरल देखील झाला, असं त्यांनी सांगितलं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.